• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
July 15, 2022
in Guhagar
17 0
0
Kunbi Samaj felicitates the students
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१७ जुलै पर्यंत फॉर्म व गुणपत्रकाची छायांकीत प्रत जमा करावी

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कुणबी समाजाचे लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त घेण्यात येणार आहे.  रविवार दि. २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गुहागर बाजार भवन मधील सभागृहात विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा करण्यात येणार आहे. Kunbi Samaj felicitates the students

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या शैक्षणिक अर्हतेबाबत उत्तीर्ण झालेल्या बोर्डाचे / विद्यापिठाचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र याची छायांकीत प्रत अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज पूर्णपणे भरुन खालील पत्यावर अथवा जवळच्या कार्यकर्त्यासोबत दि. १७ जुलै पर्यंत पाठवावीत. इयत्ता १० वीमध्ये ७०% , इयत्ता १२ वी कला / वाणिज्य मध्ये ६०% आणि विज्ञान शाखेमध्ये ५५% गुण मिळवून जे विद्यार्थी – विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत व पदवीधर झाले आहेत. तसेच एम.टी.एस. गुणवत्ता पात्र विद्यार्थी, डॉक्ट , डिप्लोमा , डि.एड् , बी.एड, इंजिनीअर यांनीही अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. Kunbi Samaj felicitates the students

कुणबी समाजातील विद्यार्थांनी १७ जुलै पर्यंत फॉर्म भरुन द्यावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर ( ग्रामीण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी पतसंस्थेचे चेअरमन श्री. रामचंद्र हुमणे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुका सरचिटणीस आणि कुणबी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. तुकाराम निवाते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गुहागर बाजार भवन शाखा कार्यालय शृंगारतळी, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली – ७७१९ ९०३५१५ व शाखा शृंगारतळी – ९६७३६०१३६०, शाखा हेदवी – ९४०३८०१२२७, संत तुकाराम छात्रालय – ९४०५९५४०२४ यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. Kunbi Samaj felicitates the students

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKunbi Samaj felicitates the studentsLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.