जवाहर नवोदयच्या प्रवेश परिक्षेत 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
गुहागर, ता. 12 : जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेत 2021 – 22 मध्ये जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा घेण्यात आली. या प्रवेश परिक्षेत तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अशी कामगिरी करणारी जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 ही एकमेव शाळा आहे. Success of Jivan Education School
प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय चालवले जाते. या विद्यालयात जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रवेश परिक्षा घेतला जाते. या प्रवेश परिक्षेत गुणवत्ता यादीत येणे. हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आवाहनात्मक असते. प्रवेश परिक्षेची तयारी विद्यार्थ्यांन कडून करून घेणे. यात शिक्षकांची देखील कसोटी असते. या पाश्वभूमीवर जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले यश कौतूकास्पद आहे. Success of Jivan Education School
जीवन शिक्षण शाळेतील इ. 5 वी मधील स्वराज विक्रम शिंदे, अनिकेत अविनाश सावंत, सत्यजीत जयेंद्र सानप या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परिक्षेत यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. अमोल धुमाळ यांनी मार्गदर्शन केले होते. Success of Jivan Education School या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर तालुक्याच्या मा. गटविकास अधिकारी श्रीम. भागवत मॅडम, विस्तारअधिकारी श्री. मुकुंद कासारे, गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख लोहकरे यांनी अभिनंदन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 व शाळेतील सर्व शिक्षकवृद यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Success of Jivan Education School