• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी संतोष वरंडे

by Mayuresh Patnakar
July 14, 2023
in Guhagar
76 1
1
6 more people joined Lions Club

गुहागर : मानाचा वुडन गॅवेल देवून अध्यक्ष पदाची सुत्रे संतोष वरंडे यांच्याकडे सोपविताना लायन्स क्लबचे वरिष्ठ अधिकारी

149
SHARES
427
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पदग्रहण सोहळ्याचे दिवशी 6 जणांनी स्विकारले सदस्यत्व

गुहागर, ता. 14 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या अध्यक्षपदी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे आणि खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती करण्यात आली. पदग्रहण सोहळ्याचे दिवशी 6 जणांनी या क्लबचे सदस्यत्व स्विकारले. त्यांना लायन नितीन गांधी शपथ दिली.  6 more people joined Lions Club

6 more people joined Lions Club
डॉ. मयुरेश बेंडल यांना सदस्यत्वाची पीन लावताना नितीन बेंडल

गुहागरमधील भंडारी भवनमध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला डॉ. विजय रिळकर, उद्योजक नितीन गांधी व विजय रटावा उपस्थित होते. डॉ. विजय रिळकर, झोन चेअरपर्सन विजय रटावा व गेल्यावर्षीचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी संतोष वरंडे यांना मानाचा वुडन गॅवेल देवून अध्यक्ष पदाची सुत्रे सोपवली.

6 more people joined Lions Club
संतोष मोरे सर यांना सदस्यत्वाची पीन लावताना माधव ओक

त्यानंतर सचिव सचिन मुसळे आणि खजिनदार मनिष खरे यांना कॉलर प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे उपस्थित होत्या.  6 more people joined Lions Club

6 more people joined Lions Club
सुधाकर कांबळे सर यांना सदस्यत्वाची पीन लावताना अध्यक्ष संतोष वरंडे

यावर्षी गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, डॉ. मयुरेश बेंडल, खातू मसाले उद्योगचे संचालक शैलेंद्र तथा भैय्या खातू, तालुक्यातील अग्रणी मोबाईल व्यावसायिक राहुल शेटे, संगणक प्रशिक्षण संस्था चालविणारे संतोष मोरे आणि सराफ विशाल गुहागरकर या सहाजणांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्विकारले. उद्योजक नितीन गांधी यांनी नव्या सदस्यांना लायन्स क्लबचे ध्येय सांगून सदस्यत्वाची शपथ दिली.  6 more people joined Lions Club

6 more people joined Lions Club
विशाल गुहागरकर यांना सदस्यत्वाची पीन लावताना सचिव सचिन मुसळे
6 more people joined Lions Club
राहूल शेटे यांना सदस्यत्वाची पीन लावताना खजिनदार मनिष खरे

यावेळी चिपळूण, सावर्डे येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी, भारतीय जीवन विमा निगमचे शाखाधिकारी, विकास अधिकारी शशिकांत कान्हेरे, विमा क्षेत्रातील व्यावसायिक, खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम खातू, यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती.  6 more people joined Lions Club

6 more people joined Lions Club
शैलेंद्र खातू यांना सदस्यत्वाची पीन लावताना माजी अध्यक्ष शामकांत खातू

पदग्रहण सोहळ्यात महिलांचा सत्कार करण्यात आला त्याचा व्हिडिओ पहा

Tags: 6 more people joined Lions ClubGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLions ClubMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.