गुहागर, ता. 30 : गुहागर मधील मुलांनी एकत्र येऊन सुरू केलेलं कोकण किनारा गोविंदा पथक घासकोपरी शनि मंदिर विरार नगरीत वर्ष ३ रे साजरे करत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख मैत्री, ऋणानुबंध कायम ठेवत ( माय भुमी हौशी भजन मंडळ- वारकरी संप्रदाय ) आणि (कोकण किनारा गोविंदा पथक) याची संकल्पना अवलंबली. 6 layer successful thrill of Kinara Govinda team


हि संकल्पना साकारण्यासाठी सुशांत जोशी, महेश येद्रे, प्रशांत जोशी, संदेश पाडदळे, रोहित घाणेकर, अभिषेक वाघे, प्रभु धावडे, हेमंत खांडेकर, Dj सचिन कुळये, कल्पेश खेराडे, सुरज कांबळे, (कोच ) सचिन मळेकर यांनी प्रयत्न केले. सोबत अनेक गावांतील मुलांनी एकत्र येऊन किनारा गोविंदा पथक सुरु केला. या गोविंदा पथकाने १ महिना रोज सराव करून ५ थरांची सलामी १४ ठिकाणी दिली. ३ ठिकाणी ६ थरांचा थरार यशस्वी झाला आणि गोल फिरता मोनोरा मानवंदना दिली, तिसरा थरावर व्यायाम बैठक ५ वेळा मारण्यात आला. अशी आगळी वेगळी “संकल्पना” वरचा छोटा गोविंदा रूद्र मलेकर, अर्णव पिंपर यांनी आयोजकांची मने जिंकली. भर पावसाची जोरदार संततधार सुरू असताना हि थरावर थर रचत होते. 6 layer successful thrill of Kinara Govinda team


हे सर्व कोकणतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा व गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी, शिवणे, दोडवली, सडे जांभारी, पालशेत – मांडवकर वाडी, वाडदई, चिंद्रावले, पिंपर, मार्गताम्हाणे, चिपळूण – तनाली, दापोली – दलखनवाडी रत्नागिरी कोतवडे, खेड-जैतापुर, राजापूर आडिवरे, देवगड-गिरजे माजगाव, राजापूर देवीहसोळ, आबाये गाव, पारवाडी, मंडणगड तालुका पन्हाळी बुद्रुक, गुजरात पालगापुर- नेनपर अशी अनेक कोकणातली मुलं सहभागी होऊन विरार नालासोपारा, वसई अशा ठिकाणी सलामी देऊन एक हंडी फोडण्याचा मान मिळाला एकुण ९ सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सोबत सोशल मीडिया प्रसार माध्यम Dj श्री सचिन कुळये तवसाळ तांबडवाडी, गुहागर) यांच्या माध्यमातून फोटो, video मोबाईल कॅमेरा) मधुन नेत्रदीपक क्षण सर्वांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 6 layer successful thrill of Kinara Govinda team

