१५७ ग्राहकांनी घेतला लाभ तर ९६ अर्जावर प्रक्रिया सुरू
मुंबई, ता. 11 : भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी केंद्रसरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछताकरिता ४० टक्केंपर्यंत अनुदानाची योजना सूरु आहे. महावितरण मार्फत ही योजना राबविली जात आहे. तरी इच्छूक घरगुती ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.या अनुदान योजनेचा लाभ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे. आपल्या छतावर ६१४ किलोवॅट क्षमतेची सौरयंत्रणा बसविली आहे. तर ९६ ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. 40% subsidy for solar roofs
रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ (४०० किलोवॅट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ (२१४ किलोवॅट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६३ (१८६ किलोवॅट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ (९९ किलोवॅट) घरगूती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॅटपर्यंत सौर छत संचास ४० टक्के तर पुढील ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी १० किलोवॅटमर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान आहे. 40% subsidy for solar roofs
सौरछत संच अनुदानासाठी प्रति किलोवॅटप्रमाणे संचाचे मुलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. १ ते ३ किलोवॅटकरीता रू.४१४००/-, ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॅटकरीता रू.३९६००/-, १० ते १०० किलोवॅट करीता रू.३७०००/- तर १०० ते ५०० किलोवॅटकरीता रू.३५८८६/- असे दर आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, एजन्सी निवडसुची, शंका-समाधान इ. माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर उपलब्ध आहे. 40% subsidy for solar roofs
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ५२३ ग्राहकांनी ४९९४ किलोवॅट क्षमतेची व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२७ ग्राहकांनी २०१२ किलोवॅट क्षमतेची विनाअनुदानित तत्त्वावरील सौर यंत्रणा अस्थापित केली आहे. १ किलोवॅट क्षमतेची सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेचे वजन जवळपास १५० किलो असते. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते. सौर पॅनलची कार्यक्षमता व सौर किरणांची उपलब्धता, भौगोलिक स्थान या घटकांचा प्रभाव एकंदरीत वीजनिर्मितीवर पडतो. 40% subsidy for solar roofs
स्थानिक बाजार मूल्यानुसार १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी ५० ते ५५ हजार रुपये दरम्यान खर्च येतो. सोलर पॅनलचा दर्जा, उपलब्ध जागा इ. घटकांचा दरावर परिणाम होतो. किलोवॅट क्षमता वाढल्यास खर्च कमी होत जातो. मासिक वीज बिलात बचत होऊन साधारणपणे सोलर रुफ टॉपसाठी गुंतविलेल्या रक्कमेची ४ ते ५ वर्षात परतफेड मिळते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरुस्ती मुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आर्युमान वाढते. 40% subsidy for solar roofs