गुहागर, ता. 17 : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील वेंगारामध्ये राहणारे 38 वर्षीय रिजेश आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी जिशी, तसेच तामिळनाडूचे रहिवासी अब्दुल कादर आणि सलियाकुंड आहेत. 4 Indians killed in massive fire in Dubai
सरकारी-संलग्न वृत्तपत्र ‘द नॅशनल’ने दुबई मीडिया ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या ‘दुबई सिव्हिल डिफेन्स’ च्या निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या आगीच्या घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. शनिवारी दुबईच्या अल रास भागात आग लागली. येथे दुबईचे मसाले बाजार भरते, जे दुबई खाडीजवळ पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे. 4 Indians killed in massive fire in Dubai

आगीची माहिती मिळताच पोर्ट सैद अग्निशमन केंद्र आणि हमरिया अग्निशमन केंद्राचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. दुबईत राहणारे भारतीय नसीर वतनपल्ली यांनी सांगितले की, मृतांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. ज्यामध्ये केरळचे जोडपे आणि अन्य दोघे तामिळनाडूचे आहेत. या अपघातात पाकिस्तानातील तीन चुलत भाऊ आणि नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला. भारतीय दूतावासाच्या मदतीने मृतदेह भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 4 Indians killed in massive fire in Dubai
