गुहागर, ता. 22 : मा. भारत निवडणुक आयोगाने दि. २५ जानेवारी २०२३ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters Day) म्हणून साजरा करणेत येणार आहे. हा कार्यक्रम सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर होणार आहे. 25 January National Voter’s Day
यावेळी उपस्थित नवीन मतदारांना निवडणूक ओळखपत्र वितरीत करणेत येणार आहे. तसेच निवडणूक बिल्ले देणेत येणार आहेत. लोकशाही बळकटीकरण होणेचे दृष्टीकोनातून निवडणूकीची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. या कार्यक्रमात लोकशाही, पारदर्शक निवडणूक, मतदानाचा हक्क या विषयांवर मार्गदर्शन करणेत येणार आहे. 25 January National Voter’s Day

२६४ गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट गुहागर तालुक्यात एकुण १४० मतदान केंद्रे असुन नव्याने नोंदणी झालेले मतदार आहेत. प्रथम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या १८ वर्षे व त्यावरील मतदारांना व इतर नागरिकांना प्रतिज्ञा देवून नवीन नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना छायाचित्र ओळखपत्र व बिल्ले मान्यवरांच्या हस्ते वाटप करणेत येणार आहेत. 25 January National Voter’s Day
तरी सदर कार्यक्रमास नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांनी केले आहे. 25 January National Voter’s Day
