• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

२०२५ नव्या जागतिक पिढीचे जन्मवर्ष

by Mayuresh Patnakar
January 1, 2025
in Bharat
86 1
0
Events happening in India in the year 2025
169
SHARES
483
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारताला विश्वगुरू म्हणून मान्यता देण्याकडे जगाची वाटचाल

Guhagar News : येते नवे वर्ष नवी जागतिक पिढी सुरु करणारे वर्ष ठरणार आहे. गेल्या १२५ वर्षांत जे जागतिक बदल घडले त्या अनुषंगाने जगभरातील विविध वयोगटातील लोकसंख्येला विविध नावांनी संबोधण्यात येते. जसे की Greatest generation म्हणजे १९०१-१९२७ पर्यंत जन्माला आलेली पिढी, त्यानंतर येते ती scilent generation आणि त्यापुढे १९४६-६४ची पिढी म्हणजे baby boomers. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात मोठ्या संख्येने मुले जन्माला घातली गेली. त्यानंतर येतात Gen X, millennials आणि Gen Zees. २०१० ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत जन्माला आलेली मुले Gen Alfa म्हणून ओळखली जातात. आणि आता मानवजातीची सर्वात नवी पिढी जनरेशन बीटा 1 जानेवारी 2025 ते 2039 पर्यंत जन्माला येईल. 2025 is the birth year of a new global generation

2035 पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या 16% असणाऱ्या या बिटांची काही वैशिष्ट्ये असणार आहेत. एकतर हि मुले जनरेशन वाय (सहस्त्र वर्ष) आणि जनरेशन झेड यांची मुले असणार आहेत. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना कश्या प्रकारचे पालकत्व देतील? कोणती जीवनमूल्ये घेऊन हि मुले जीवन जगातील? त्यांच्या कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय मते जगाच्या इतिहास, भूगोल, पर्यावरण, येणाऱ्या शंभर वर्षांवर कसा प्रभाव टाकतील? याविषयी बरीच चर्चा होत आहे. कारण २२वे शतक पाहण्यासाठी या बीटा पिढीतील अनेकजण जगतील. 2025 is the birth year of a new global generation

भारतीय आणि हिंदू म्हणून आपण नव्या तंत्रज्ञानाने ओथंबलेल्या या जागतिक पिढीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असणार आहेत? त्यांना कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत? विविध स्तरांवर आणि विविध क्षेत्रांत अश्या सर्वच बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापर्यंत भारतीय समाजाने जगात काय कामगिरी केली आहे याचा आढावा घेऊ.

जगात भारतीयांचाच डंका

आज चीनलाही मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. जगातील इंटरनॅशनल डायस्पोरा म्हणजे एका विशिष्ट समाजातून किंवा देशातून स्थलांतरित झालेल्या लोकांचा विचार करता सर्वाधिक स्थलांतरितांची संख्या भारतीयांची आहे. हि संख्या ३. ५ कोटींहूनही अधिक आहे. भारतीयांना संकुचित, कूपमंडूक, पुरुषसत्ताक वगैरे समजणाऱ्या लोकांनी पुढील माहिती नीट वाचावी. 2025 is the birth year of a new global generation

परदेशस्थ किंवा दुसऱ्या देशांचे नागरिक असणाऱ्या मूळ भारतीयांची स्थिती समजून घेण्यासाठी अमेरिकेतील आकडेवारी पाहू. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या १. ४७% भारतीय लोक अमेरिकेत राहतात. त्यापैकी १% लोक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.

ड्यूक युनिव्हर्सिटी आणि यूसी बर्कले यांच्या संयुक्त अभ्यासातून असे दिसून आले आहे, की भारतीय स्थलांतरितांनी 1995 ते 2005 पर्यंत इंग्लंड, चीन, तैवान आणि जपानमधील स्थलांतरितांपेक्षा अधिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कंपन्या स्थापन केल्या आहेत. 2025 is the birth year of a new global generation

भारतीय स्थलांतरितांनी स्थापन केलेल्या सिलिकॉन व्हॅली स्टार्टअपची टक्केवारी 1999 मधील 7% वरून 2006 मध्ये 15.5% पर्यंत वाढली आहे.

भारतीय अमेरिकन अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये (उदा., IBM, PepsiCo, MasterCard, Google, Facebook, Microsoft, Cisco, Oracle, Adobe, Softbank, Cognizant, Sun Microsystems.) सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले आहेत. फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये २० पेक्षाही अधिक सीईओ भारतीय वंशाचे आहेत.

अमेरिकन जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतीय अमेरिकन लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर सर्वच वांशिक गटांना कायमच मागे टाकत आले आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सचे थॉमस फ्रीडमन, यांच्या ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ या पुस्तकात, भारतीय अमेरिकनांचे खूपच कौतुक केले आहे. 1990 पर्यंतच्या सर्वेक्षणानुसार गैर-स्पॅनिश, कॉकेशियन अमेरिकनांनंतर (3.9%) डॉक्टरांचा दुसरा सर्वात मोठा गट भारतीय मुलाच्या लोकांचा आहे. आणि पुढे 2005 मध्ये तर भारतीय डॉक्टरांचा वाटा अंदाजे 6% पर्यंत वर गेला. आज हे एक टक्का भारतीय अमेरिकेतील एकूण डॉक्टरांपैकी सुमारे 10% झाले आहेत. शिक्षक आणि अभियंते यांची एक महत्त्वपूर्ण परंतु अप्रमाणित टक्केवारी भारतीयांची आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की सिलिकॉन व्हॅलीमधील एक तृतीयांश अभियंते भारतीय वंशाचे आहेत. जगभरात कुठेही गेलात तरी नोकरी, व्यवसाय, सामाजिक, कौटुंबिक संबंध या सर्वच बाबतींत भारतीयांना प्राधान्य दिले जाते. 2025 is the birth year of a new global generation

शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे तर 2015 मध्ये केल्या गेलेल्या प्यू रिसर्चनुसार, 25 आणि त्याहून अधिक वयाच्या भारतीय अमेरिकन लोकांपैकी 72% लोकांनी बॅचलर डिग्री आणि 40% लोकांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तर एकूण अमेरिकन लोकांपैकी 19% ने बॅचलर डिग्री आणि 11% ने मास्टर्स डिग्री मिळवली आहे. विचार करा, या भारतीयांना भारतात कर्तृत्व दाखवायच्या आणि आर्थिक उन्नती करायच्या संधी प्राप्त झाल्या तर हे गुणी लोक भारताला कुठच्या कुठे नेवून ठेवतील.

कुटंबव्यवस्था टिकविण्यात भारतीय पुढे लग्न करणे आणि ते टिकवून कुटुंब व्यवस्था टिकवणे, यातही भारतीयच सर्वात पुढे असलेले आपण पाहतो. अमेरिकेतही भारतीय कुटुंबांचे घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. मुलाना उत्तमोत्तम जीवनमूल्ये, उत्तम आहार आणि स्थिर, विकासाभिमुख कुटुंब मिळवून देण्यात भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही, हेच आता परत परत सिद्ध होते आहे. या सगळ्या ओजस्वी, अभिमास्पद आकडेवारीच्या मुळात भारतीय जीवनपद्धती, जीवनमूल्ये आणि भारतीय तत्वज्ञान आहे, हे आता सगळे जगच मान्य करू लागले आहे.

जगाने आजवर दोन महत्वाचे सामाजिक आर्थिक धक्के पचवले आहेत. ते म्हणजे समाजवादी आशावाद आणि कम्युनिस्ट विचारधारा आणि त्याचे रक्तरंजित परिणाम. आज भारतीयांना जगभरात प्रचंड सन्मान मिळतो आहे, त्याच्या मागे भारतीय राजकारणी, इथली मजबूत परिस्थिती तर आहेच परंतु भारतीय विचारसरणी आणि त्याचे जगाला मिळत असणारे फायदे हेही जग आता मान्य करण्याच्या परिस्थितीत येत आहे. 2025 is the birth year of a new global generation

आज भारताची soft power म्हणून योग, आसने, ध्यान, आयुर्वेद, भारतीय हिंदू धर्माची जीवनशैली अश्या शुद्ध भारतीय गोष्टींकडे जग प्रचंड वेगाने आणि प्रचंड प्रमाणात आकृष्ट होत आहे. अब्राहमिक पंथांचा फोलपणा, पोकळपणा, दिखाऊपणा, सत्तापिपासू, स्वार्थी विचारधारा आता जगाला समजून येऊ आहे.

त्याच्या पार्श्वभूमीवर चिरंतन, शुद्ध, सात्विक, संपूर्णपणे शास्त्रीय, सर्वात नैसर्गिक अशी भारतीय जीवनपद्धती, आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध केलेले ज्ञान या शांती, समाधान, अध्यात्मिक प्रगतीसाठी आसुसलेल्या जिवांना हवेसे वाटले तर नवल ते काय?

Sustainable living, अध्यात्मिक, लौकिक जीवनात उत्कर्ष साधत कोणावरही अन्याय, अत्याचार होऊ न देता, कोणाला न लुबाडता जीवन जगायला हिंदू धर्म शिकवतो. आजही काही धार्मिक कार्यक्रम करण्याच्या आधी आजूबाजूच्या पाणी, जमीन, वायू, सूर्य, निसर्ग अश्या नैसर्गिक स्त्रोतांची क्षमा मागून, त्यांचा आशीर्वाद घेऊन मग यज्ञादी कार्ये पुढे सुरु केली जातात.

ही पृथ्वी तुमच्या उपभोगासाठी आहे आणि तुम्हाला वाट्टेल तसे तुम्ही तिला ओरबाडू शकता, कारण तुम्ही येशूचे followers आहात असे न शिकवता, ही पृथ्वी हा ग्रह आपली माता आहे, तिच्या उदरात आपले अस्तित्व आहे. त्यामुळे तिचा सन्मान करणे, तिला सांभाळणे, तिची निगा राखणे आपले कर्तव्य आहे, अशी शिकवण हेच भारतीय जीवनमूल्य आहे. आणि मानवजात जर पृथीतलावर टिकावी असे वाटत असेल तर पृथ्वीची नासाडी थांबवणे आवश्यक आहे. 2025 is the birth year of a new global generation

जीवनाचा उद्देश केवळ खाणे, पिणे, पैसा कमावणे, मुले जन्माला घालून मरुन जाणे इतकाच नसून या मानव देहाचा सर्वोत्तम उपयोग करण्याची संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे, या हिंदू धर्मातील संकल्पनेचा परीसस्पर्श झालेला कोणीही मग नितीमत्तेपासून न ढासळता जीवनाचा सर्वोत्तम उपयोग करू लागतो. त्यामुळे हि भारतीय मानसिकता आणि जीवनपद्धती जगाला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जनरेशन बीटा ने या दृष्टीने जीवनाचा विचार सुरु करावा यासाठी पालकत्वामध्ये आवश्यक सुधारणा, upgradation करणेच आधीच्या पिढ्यांची गरज असणार आहे.

आज अनेक देशांमध्ये गुरुकुल, वैदिक पद्धतीच्या शाळा उभ्या राहू लागल्या आहेत. आज यांचे प्रमाण कमी आहे. पण या जनरेशन बीटा मध्ये अश्या शाळांना प्रचंड traction असणार आहे. भारतीय शिक्षणाची एकूण पद्धतीच आता बदलू घातली आहे. त्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचा मोठा हात असणार आहे.

एखादा देश संपवायचा असेल किंवा युद्ध न करता त्याला आपल्या ताब्यात घ्यायचे असेल तर तिथले शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळावा, पुढच्या २५ वर्षांत तो देश तुमचा गुलाम असेल असे subversion technique हा विषय आपल्या मुलाखतीतून जगाला प्रथम सांगणाऱ्या रशियन युरी बेझमेनोव्ह यांनी म्हटले होते. आज भारताने आपली शिक्षण पद्धती भारतीय स्वरूपाची करायला सुरुवात केली आहे. जनरेशन बिटाच्या कार्यकाळात भारताला विश्वगुरू म्हणून मान्यता देण्यावाचून आता जगाला पर्याय असणार नाहीये. 2025 is the birth year of a new global generation

Tags: 2025 is the birth year of a new global generationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.