भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकर भवनासाठी 75 लाख
गुहागर, ता. 01 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) उदय सामंत (Uday Samant) यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1 कोटी, 16 लाख 55 हजार, 588 निधीची तांत्रिक मान्यता दिली आहे. 1 crore for Guhagar City. 2022-23 आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून (District Planning Committee) या कामांसाठी 69 लाख 17 हजार, 340 मंजूर करण्यात आले आहेत.
गुहागर नगरपंचायतीमधील नगरसेवक अमोल गोयथळे, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, दत्ताशेठ जांगळी, अमरदीप परचुरे, शहर प्रमुख निलेश मोरे यांनी गुहागर शहरातील 6 कामांना निधी मिळावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केली. गुहागर (Guhagar) नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी या कामांचे परिपूर्ण प्रस्ताव होण्यासाठी साह्य केले होते. 1 crore for Guhagar City
या कामांना महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. 1 कोटी, 16 लाख 55 हजार, 588 निधीची (1 crore for Guhagar City) उपलब्धता करुन दिली. इतकेच नव्हेतर पुढील वर्षभरात ही विकासकामे पूर्ण व्हावीत म्हणून 2022-23 या आर्थिक वर्षात या कामांसाठी 69 लाख 17 हजार, 340 मंजूर केले. 1 crore for Guhagar City
यामध्ये गुहागर असगोली मुख्य रस्ता ते संदीप घाडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण 29 लाख 10 हजार 417 रुपये, खालचापाट लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील पाखाडी बांधण्यासाठी 16 लाख, 37 हजार, 774 रुपये, गणपती विसर्जन पाखाडी बांधण्यासाठी 8 लाख 77 हजार 977 रुपये, दुर्गादेवीवाडी डांगळे होम ते धारेपर्यंत रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणेसाठी 22 लाख 91 हजार 588 रुपये, भंडारी भवन समोरील भागाला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 24 लाख, 16 हजार, 520 रुपये आणि गुहागर बाग पाचमाड रस्त्यावरील दत्त मंदिराला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 15 लाख, 21 हजार, 312 रुपये या कामांचा समावेश आहे. 1 crore for Guhagar City
याशिवाय पालकमंत्री सामंत यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत गुहागर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सभागृह बांधण्यासाठी 75 लाखांचा निधीही मंजूर केला आहे. 1 crore for Guhagar City
District Planning Committee gives 59%
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) 27 मार्च 2023 च्या पत्रानुसार गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कामांना खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे. गुहागर असगोली मुख्य रस्ता ते संदीप घाडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण 17 लाख 28 हजार 788 रुपये, खालचापाट लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील पाखाडी बांधण्यासाठी 9 लाख, 72 हजार, 838 रुपये, गणपती विसर्जन पाखाडी बांधण्यासाठी 5 लाख 21 हजार 518 रुपये, दुर्गादेवीवाडी डांगळे होम ते धारेपर्यंत रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणेसाठी 13 लाख 61 हजार 209 रुपये, भंडारी भवन समोरील भागाला पेडिंग ब्लॉक बसविण्यासाठी 14 लाख, 35 हजार, 413 रुपये आणि गुहागर बाग पाचमाड रस्त्यावरील दत्त मंदिराला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 8 लाख, 94 हजार 574. प्रत्येक कामासाठी सुमारे 59 टक्के निधी वितरीत केल्याने ही कामे पुढील वर्षभरात पूर्ण होतील. 1 crore for Guhagar City
Tags : Guhagar News, Marathi News, News in Guhagar, Guhagar, Top News, Local News, Latest News, Latest Marathi News, गुहागर न्यूज, मराठी बातम्या, स्थानिक बातम्या, ताज्या बातम्या, स्थानिक मराठी बातम्या, Jan Suvidha Yojana, District Planning Committee, 1 crore for Guhagar City, Guardian Minister, Uday Samant, पालकमंत्री, उदय सामंत, जिल्हा नियोजन मंडळ, रत्नागिरी, Ratnagiri, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, District Planning Committee, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,