परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचा उपक्रम
रत्नागिरी, ता.17 : शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरने क्रांतीकारक, देशभक्तांविषयी माहिती व्हिडिओद्वारे देण्याचा अनोखा उपक्रम राबवून साडेसहाशे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागवली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेले वर्षभर हा उपक्रम सुरू होता. कोरोना कालावधीत शाळा ऑनलाइन सुरू झाल्यानंतर या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक विनोद नारकर आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिली असता त्यांनी विद्यामंदिरचे हार्दिक अभिनंदन केले. Awakened patriotism among students


या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर, प्रकाश कदम, सौ. कांचन शिंदे, सौ. गीताली शिवलकर, सौ. शिवानी मोहिते, सौ. ज्योती शेंडगे, सौ. नेहा भातडे, सौ. संपदा सावंत, महेश साळुंके, उदय आरेकर, सौ. प्रणोती सिनकर, सौ. स्मिताली परब, सौ. स्वप्नाली आयरे यांनी क्रांतीकारकांची माहिती संकलित करून त्याचे स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ साकारले. प्रत्येक वर्गाच्या व्हॉटस्अप ग्रुपवर हे व्हिडिओ पाठवले जात होते. Awakened patriotism among students
भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अनेक भारतीय शहीद झाले, ज्यांचे वय खूपच कमी होते. परंतु त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्याचा लढा सुरु ठेवला. लाखो वीरांच्या बलिदानानंतर भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले. छोटया छोटया मुलांना या क्रांतिकारक, देशभक्तांविषयी माहिती होणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्यात स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. गतवर्षी १५ ऑगस्टला या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यामध्ये आम्ही छोटया व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रांतिकारक, देशभक्तांविषयी माहिती दिली. हे सर्व व्हिडीओज शिक्षकांनी तयार करून विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन पाठवले. दर आठवडयाला एक याप्रमाणे आतापर्यंत ५० पेक्षा व्हिडीओज पाठवले. Awakened patriotism among students


जिल्ह्यातील शाळांमध्येही व्हिडिओ पोहोचवू
पालकांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले. पाल्यांना क्रांतिकारक, देशभक्तांविषयी खूप माहिती मिळाली. त्यामुळे मुले पुस्तकेही वाचू लागली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निश्चितच वाढणार आहे. यासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. प्रदिप तथा बाबा परुळेकर, कार्याध्यक्षा अॅड. सौ. सुमिता भावे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये हा उपक्रम व्हिडीओच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये पोहोचविण्याचा असल्याची माहिती विनोद नारकर यांनी दिली. Awakened patriotism among students