• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीच्या अथर्व शेंड्येचे “एव्हरेस्टिंग” यश

by Mayuresh Patnakar
June 26, 2026
in Ratnagiri
21 0
0
"Everesting" success of Atharva Shendy of Ratnagiri
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टीम कोकण कोस्टलची साथ; ४१ तासांत ५०० किमीहून अधिक सायकलिंग, १० हजार मीटर चढाई

रत्नागिरी, ता. 26 : गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कामगिरी करत सायकल एव्हरेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं. रत्नागिरीजवळील टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढाव त्याने तब्बल ७० वेळा पार करत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग आणि १०,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण केली. “Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

समुद्रसपाटीपासून एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर आहे. सायकलस्वाराने एका निश्चित टेकडीवर सतत चढ-उतार करत किमान ८,८४८ मीटर उंची गाठणे, याला एव्हरेस्टिंग असे म्हटले जाते. जगभरातील सायकलपटूंमध्ये हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि आव्हानात्मक उपक्रम मानला जातो.

"Everesting" success of Atharva Shendy of Ratnagiri

रत्नागिरी परिसरात एव्हरेस्टिंगच्या कठोर नियमांमध्ये बसणारा चढ उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक सायकलप्रेमींना यासाठी मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जावे लागत होते. गेली दोन वर्षे अथर्व अशा योग्य चढाच्या शोधात होता. एव्हरेस्टिंगचे नियम अत्यंत कठोर असल्याने अनेक चढाव पात्र ठरत नव्हते. अखेर अथक प्रयत्नांनंतर त्याने टेंब्ये- चाळकेवाडी हा मार्ग शोधून काढला आणि त्याला एव्हरेस्टिंगसाठी मान्यता मिळवून दिली. मात्र खरी कसोटी होती हा चढ तब्बल ७० वेळा सायकलवरून चढणे आणि उतरणे. एव्हरेस्टिंगच्या नियमांनुसार झोप घेता येत नसल्याने अथर्वने खाणे, नैसर्गिक क्रिया, मसाज आणि इतर आवश्यक विश्रांतीसाठी मिळणारा अत्यल्प वेळ अतिशय नियोजनपूर्वक वापरला. “Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

या संपूर्ण मोहिमेसाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन तसेच टेंबेपूल व पोमेंडी गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जवळपास ४१ तास रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टलचे सदस्य या मार्गावर जागता पहारा देत होते. अथर्व मानसिकदृष्ट्या खंबीर राहावा यासाठी अनेक सदस्य त्याच्यासोबत सायकलिंग करत राहिले. तसेच त्याच्या हायड्रेशन, न्यूट्रिशन आणि इतर आवश्यक गरजांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. “Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

"Everesting" success of Atharva Shendy of Ratnagiri


टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनशी संबंधित पोमेंडी येथील सचिन मराठे, सौ. मानसी मराठे व कुटुंबीयांनी अथर्वसाठी जेवण, नाश्ता आदी व्यवस्था केली. अथर्व देवस्थळी यांनी तब्बल ४१ तास जागे राहून ऑन-रूट सपोर्ट दिला. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, सचिव डॉ. नितीन सनगर व सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्यासमवेत सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, डॉ. राज कवडे, रुद्र जाधव, ज्ञानेश्वर पांडे, विवेक खानविलकर, विनायक पावसकर, सौरभ रावणंग, विशाल भोसले, अविनाश फडके, केदार देवस्थळी, राकेश होरंबे, राहुल भोसले, श्रीनंद लिमये, गजानन भातडे, अमित पोटफोडे, अभिजित पड्याळ, प्रसाद खेडेकर, प्रथमेश प्रभुदेसाई, सचिन नाचणकर, योगेश सामंत, सौ. मुग्धा भट-सामंत, स्नेहल भिसे, राजेंद्र भावे, मकरंद पटवर्धन, योगेश मोरे इतर सदस्यांनी मसाज, तांत्रिक मदत तसेच अथर्वच्या मानसिक आणि शारीरिक तयारीची विशेष काळजी घेतली. Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

अथर्वच्या या यशामुळे एव्हरेस्टिंग उपक्रमाचे एक नवे दालन संपूर्ण कोकणासाठी खुले झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रासह देशभरातील अधिकाधिक सायकलपटू एव्हरेस्टिंगसाठी रत्नागिरीत येतील, असा विश्वास रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने व्यक्त केला. यामुळे फिटनेस टुरिझमला चालना मिळणार असून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची भर पडणार आहे. “Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

रत्नागिरीत ८ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेले “रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन” हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याला दिशा देणारे ठरले. संमेलनानंतर सविस्तर माहिती घेतली असता राम जोशी यांच्याकडून “एव्हरेस्टिंग” ही संकल्पना समजली. एव्हरेस्टच्या समुद्रसपाटीपासून असलेल्या उंचीइतका सलग चढ सायकलिंग किंवा रनिंगद्वारे पूर्ण करणे. या प्रवासात सायकल गौरव पुरस्कारप्राप्त विनायक वैद्य, सायकल गौरव पुरस्कार प्राप्त अंबरीश गुरव, तसेच राम जोशी, मीरा वेलणकर तसेच पुणे येथील सौ. जोग यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. “Everesting” success of Atharva Shendy of Ratnagiri

Tags: "Everesting" success of Atharva Shendy of RatnagiriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.