विक्रांत जाधव : माझी रत्नागिरी अभियानात घेतला सहभाग
गुहागर, ता. 7 : आपण बहुमोल असे काम करत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे. असे सांगत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य पथकाला हात जोडून धन्यवाद दिले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला.
You are doing valuable work. Therefore, I have come to encourage you and thank you on behalf of Ratnagiri Zilla Parishad. Said Ratnagiri Zilla Parishad President Vikrant Jadhav to the health team of My Ratnagiri Activist.
आज गुहागर तालुक्यातील आरेगांवमध्ये जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या अभियानात सहभाग घेतला. आरोग्य पथकासोबत त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत महाजन यांच्यासोबत अभियानातील अडीअडचणींबाबत चर्चा केली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विक्रांत जाधव म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची भुमिका निभावत आहात. या अभियानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चित कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही आलो आहोत. गेल्यावेळीही तुम्ही हे काम केले आहे. मात्र तेव्हा लोकांचा विरोध झाला होता. यावेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व लोकप्रतिनिधींद्वारे आम्ही जनतेपर्यंत संदेश पोचवला आहे. जागृती केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात तुमचे स्वागत होईल. मात्र हे काम करताना तुम्ही देखील तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जिल्हा परिषद रत्नागिरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष भेटून गेल्यावर आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली असता एकाने सांगितले की, अध्यक्ष आल्यामुळे खरोखरच आम्हाला प्रोत्साहन मिळाले. मे महिन्याच्या उन्हातून आम्ही प्रत्येक घरी जावून चौकशी करत आहोत. मात्र मनात प्रश्र्न होता की याची खरोखरच दखल घेतली जाते का. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुध्दा आम्हाला भेटण्यासाठी वेळ काढतात. म्हणजे आमचे काम तितकेच महत्त्वाचे असल्याची खात्री पटली. कोरोना महामारी जाण्यासाठी सर्वांनीच एकत्र येवून लढा देण्याची गरज आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यात आज काय घडले ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टँकर नाही म्हणून पाणीच पुरवणार नाही का
जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागर केले लसीकरण
आरजीपीपीएलला कोविड सेंटर करावेच लागणार
माझी रत्नागिरी अभियानामुळे प्रादुर्भाव कमी होईल
आरोग्य पथकाचे मानले आभार