• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

by Guhagar News
March 11, 2026
in Ratnagiri
144 1
0
Zilla Parishad School Award
283
SHARES
808
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 11 : ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजने अंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आदर्श शाळा निवडीसाठी उपस्थितीचे शेकडा प्रमाण, सा. फु. द. पा. योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.2, शाळेतील उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान इत्यादी निकषांचा विचार करण्यात आला. Zilla Parishad School Award

जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शाळा पुरस्कार सन 2025-26 साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा गटातून मंडणगड तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा गांधी चौक, दापोली तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा आंजर्ले नं. 1, खेड तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा आंबडस सोलकरवाडी, चिपळूण तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा आंबतखोल तांबडवाडी, गुहागर तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा पाचेरीसडा नं.2 कवठीवाडी, संगमेश्वर तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा तुरळ सुवरेवाडी, रत्नागिरी तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा नाखरे भगवती नं. 2, लांजा तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा वेसुर्ले तर राजापूर तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा कोंडीवळे गोतावडेवाडी या शाळांची निवड करण्यात आली आहे.  Zilla Parishad School Award

वरिष्ठ प्राथमिक शाळा गटातून मंडणगड तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पालघर मराठी, दापोली तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा शिर्दे, खेड तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा चिंचघर दस्तुरी, चिपळूण तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.1, गुहागर तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वरवेली नं. 1, संगमेश्वर तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गोठणे पुनर्वसन हातीव, रत्नागिरी तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा भोके मायंगडेवाडी, लांजा तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार तर राजापूर तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक गोखले कन्या शाळा या शाळांची निवड करण्यात आली आहे. Zilla Parishad School Award

आदर्श शाळा पुरस्कार समितीच्या सभेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी, प्राचार्य स.रा.देसाई अध्यापक विद्यालय विक्रांत रावराणे व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक जि.प.प्राथ. आदर्श शाळा वाटद कवठेवाडी ता जि. रत्नागिरी माधव विश्वनाथ अंकलगे, उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. Zilla Parishad School Award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarZilla Parishad School Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share113SendTweet71
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.