• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 June 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने ‘झिरो एक्सडेंट ड्राईव्ह’ मोहीम

by Mayuresh Patnakar
June 12, 2026
in Guhagar
61 1
0
'Zero Accident Drive' campaign
120
SHARES
344
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक पातळीवर ‘झिरो एक्सडेंट ड्राईव्ह’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राणघातक अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  ‘Zero Accident Drive’ campaign

या मोहिमेंतर्गत गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, व्यापक जनजागृती आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधून अपघात प्रतिबंधासाठी बहुआयामी उपाययोजना करण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या मोहिमेची तीव्रता अधोरेखित झाली आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  ‘Zero Accident Drive’ campaign

केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ व पोलीस चौकी, गुहागर शहर, आबलोली बाजारपेठ व पोलीस चौकी येथे विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध संस्थांमध्ये मार्गदर्शन सत्रे, संवाद कार्यक्रम आणि रस्ते सुरक्षा अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख करून त्याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांनाही गती देण्यात आली आहे. तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ मध्ये वाहतूक सुरक्षा उपाययोजना अधिक गतीने राबविण्यात आल्या आहेत. तसेच संभाव्य अपघात क्षेत्रांमध्ये सूचना फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. ‘Zero Accident Drive’ campaign

रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे स्वतः व पोलीस कर्मचारी वाहनचालकांना मद्यपान करून वाहन चालविणे टाळण्याचे, वेगमर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत आहेत. ‘Zero Accident Drive’ campaign

Tags: 'Zero Accident Drive' campaigncampaigndriverGuhagarGuhagar NewsGuhagar Police StationhelmetLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarगुहागर पोलीस ठाणेटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामोहीमलोकल न्युजवाहनचालकहेल्मेट
Share48SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.