• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

by Guhagar News
April 16, 2026
in Guhagar
795 9
0
Youth Dies in Two-Wheeler Accident
1.6k
SHARES
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिखली मठासमोर थरार, दुसऱ्याची स्थिती चिंताजनक

गुहागर, ता. 16 :  तालुक्यातील चिखली येथील स्वामी समर्थ मठासमोर आज (ता.१६)  दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये ओम संतोष शीतप (वय २३,  रा. पवारसाखरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  तर दुचाकीवर मागे बसलेला ऋतिक रमेश भुवड (वय २५)  हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. Youth Dies in Two-Wheeler Accident

घटनास्थळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, ओम आणि ऋतिक हे दोघे तरुण  दुचाकीने (क्रमांक MH08 BH 8830) श्रुंगारतळीकडून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. यावेळी चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ थांबलेली चारचाकी  (क्रमांक MH 12 HV 5195)गाडीचा चालक आपल्या ताब्यातील वाहन चालवत गुहागरच्या दिशेने वळवत होते. वेगाने आलेल्या दुचाकीने या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की,  स्थानिक नागरिक, मठात दर्शनाला आलेले भाविक धावत रस्त्यावर आले. अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला होता, तर ऋतिक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नागरिकांनी तत्काळ त्याच चारचाकीतून जखमी ऋतिकला चिखली शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. Youth Dies in Two-Wheeler Accident

दरम्यान पोलिसांनी पंचनामा व शव विच्छेदन आदी प्रक्रिया पार पाडून ओम शितपचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. तसेच चारचाकी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. Youth Dies in Two-Wheeler Accident

ओम शीतप हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याला तीन बहिणी आहेत. त्याच्या निधनामुळे शीतप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पवारसाखरी गावावर शोककळा पसरली आहे. Youth Dies in Two-Wheeler Accident

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth Dies in Two-Wheeler Accidentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share625SendTweet391
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.