गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मळण येथील दिलीप आगरे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. यावेळी खामशेत पाष्टेवाडी येथील नरेश पाष्टे हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल जावून तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये आणण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मयत म्हणून घोषित केले. Youth dies after falling from wall

सदरची घटना आज दिनांक 28.5.2026 सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. मयत नरेश पाष्टे वय वर्षे 34, राहणार खामशेत पाष्टेवाडी हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल गेला आणि तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये पडला. त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत म्हणून घोषित केले. पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 194 आ.मृ. म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे करीत आहेत. Youth dies after falling from wall