गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांच्या अंतर्गत योगा प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षक आदिती धनावडे यांनी जीवनात योगाचे महत्त्व, योगाचे होणारे फायदे, तसेच विविध योग प्रकार स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले. व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. Yoga Training at Veldur Navanagar School


जिल्हा परिषद शाळा वेलदुर नवानगर शाळेच्या वतीने प्रशिक्षक अदिती धनावडे व गणेश धनावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पत्रकार श्री गणेश धनावडे व मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी योगा विषयी माहिती सांगितली. त्यावेळी प्रशिक्षक सौ आदिती गणेश धनावडे, पत्रकार गणेश धनावडे, मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, परीक्षित दाभोळकर, अंकिता कोळथरकर, सोनाली खडपे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. Yoga Training at Veldur Navanagar School

