दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड व श्री अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योगशिबीर – मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे शिबीर श्री देव कोपरी नारायण देवस्थान वरचा पाट येथे घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्या 50 जणांनाच प्रवेश देण्यात येईल. Yoga camp at Kopri Narayan Temple

या योग शिबिराच्या माध्यमातून जनमानसामध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्याकरिता श्री अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या तज्ञ व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. सदर शिबिरामध्ये मधुमेह, हृदयविकार, पाठ दुखी, कंबर दुखी, मानदुखी,, गुडघेदुखी व इतर शारीरिक व्याधींविषयी समज, गैरसमज व त्यावर आवश्यक उपाय व आपण घ्यावयाची काळजी संबंधी विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाईल. Yoga camp at Kopri Narayan Temple
या शिबीरासाठी दि. 23 फेब्रुवारी सायंकाळी 4 ते 6 वाजता नोंदणी व परिचय घेण्यात येईल. तर दि. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी सकाळी 6 ते 8 वाजता योग प्रशिक्षण घेतले जाईल. तरी या योग शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे श्री देव कोपरी नारायण देवस्थान कडून कळविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अद्वैत गोखले 9421934327 या नंबर वर संपर्क साधावा. Yoga camp at Kopri Narayan Temple
