७ ते १२ मार्च रोजी वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न
गुहागर, दि.16 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Maharshi Parashuram College of Engineering) विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे विद्युत अभियांत्रीकीच्याच विद्यार्थ्यांसाठी दिनांक ७ मार्च ते १२ मार्च २०२२ या काळात वरील विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. Workshop on PCB Design and Aurdino


पुस्तकी अभ्यासक्रमाला प्रात्यक्षिक अनुभव आणि कौशल्याधारित शिक्षणाची जोड मिळावी. या हेतूने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभिनव उपक्रम राबवण्यामध्ये परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय कायमच अग्रेसर राहिलेलं आहे. यावर्षी द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी वरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना PCB म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे विविध उपयोग, उपयोजने, PCB या तंत्राचा शोध कसा लागला. तेव्हापासून आजतागायत त्यात कोणकोणती स्थित्यंतरे झाली, याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक प्रशिक्षण म्हणून PCB इचिंग आणि ड्रिलिंग पद्धत दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांकडून PCB वर एक इलेक्ट्रॉनिक सर्किट बनवून घेण्यात आले ज्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. Workshop on PCB Design and Aurdino


या सोबतच aurdino या आधुनिक उपकरणाच्या प्रोग्रामिंगची माहिती मिळावी याकरिताही एक खास सत्र या कार्यशाळेत ठेवले गेले होते. aurdino वापरून वाहतुकीचे सिग्नल नियंत्रित करण्याचा संपूर्ण प्रोग्रॅम यावेळी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला. आणि त्याचे प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करवून घेतले गेले. Workshop on PCB Design and Aurdino
उपरोक्त कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षण देण्यासाठी सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी विद्युत विभागाच्या द्वितीय वर्षाचे २७ विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. शनिवार १२ मार्च रोजी प्रशस्तिपत्रक वितरण समारंभाने या कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी “भविष्यात अशाच प्रकारच्या कार्यशाळा राबवाव्यात” असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला उत्साह बोलून दाखवला. Workshop on PCB Design and Aurdino
या कार्यशाळेच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे प्रमुख डॉ. श्री. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अविनाश पवार आणि विद्युत विभागाचे प्रमुख श्री. सतिश घोरपडे यांनी विशेष मेहनत घेतली. Workshop on PCB Design and Aurdino

