• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुलाखतीसाठी विविध कौशल्यांची गरज

by Ganesh Dhanawade
August 18, 2025
in Guhagar
67 1
0
132
SHARES
377
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नरहर देशपांडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखतीचे कौशल्य यावर कार्यशाळा

गुहागर, ता. 18 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे एक दिवशीय मुलाखतीचे कौशल्य यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली.  यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. खोत, प्रा. सुभाष घडशी, प्रा. कांचन कदम आणि इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. भागवत सर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये एकूण 122 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Workshop at Patpanhale College

कोकणातील विद्यार्थी हुशार आहेत. तसेच चांगले शिक्षण घेऊन देखील मुलाखतीचे कौशल्य नसल्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये मुंबई पुण्यामध्ये गेल्यानंतर ती खूप मागे पडतात हे लक्षात घेऊन पाटपन्हाळे महाविद्यालयाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांना प्रशिक्षण देणारे आणि मुलाखती बाबत मार्गदर्शन करणारे श्री. नरहर देशपांडे ( ठाणे ) उपस्थित होते.  त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये खाजगी क्षेत्रातील मुलाखत नेमकी कशी असते. त्याचे स्वरूप कसे असते याची माहिती दिली. तसेच मुलाखत देताना ज्यावेळी मुलाखत कक्षामध्ये आपण प्रवेश करतो, तेव्हापासून ते मुलाखत कक्षातून बाहेर येईपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या तसेच कोणत्या गोष्टी टाळावयाच्या याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.  Workshop at Patpanhale College

मुलाखत देणे ही एक कौशल्यपूर्ण बाब असून ती आपल्याला सवयीने सहज साध्य करता येते, हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करून सांगितले. मुलाखत देताना सर्वसाधारणतः कोणत्या चुका घडतात आणि त्या चुका घडू नये म्हणून कसे प्रयत्न करावेत. आणि मुलाखती मध्ये आपले वर्तन कसे ठेवावयाचे, आपली देहबोली कशी असावी, ड्रेस कोड कोणता असावा तसेच आपला बायोडाटा कसा तयार करावा याचा त्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट करावयाच्या आणि आपली फाईल कशाप्रकारे तयार करावयाची या संदर्भात विद्यार्थ्यांना अचूक असे मार्गदर्शन केले. Workshop at Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorkshop at Patpanhale Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.