स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान; ग्रामपंचायतचा उपक्रम
गुहागर, ता. 27 : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे धोपावे येथे आयोजन करण्यात आले. Women’s Health Checkup at Dhopawe
हे शिबिर दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री कालिकामाता जनजागृती मंडळच्या नवरात्र उत्सव ठिकाणी घेण्यात आला. ग्रामपंचायत धोपावे-तेटले आणि कालिकामाता जनजागृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तसेच महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीची सुविधाही शिबिरात उपलब्ध होती. यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड व मोबाईल सोबत आणणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले होते. Women’s Health Checkup at Dhopawe

या शिबिरामध्ये स्तन व गर्भाशय कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, क्षयरोग तपासणी तसेच सामान्य आरोग्य समस्यांवर उपचार व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. किशोरवयीन मुलींसाठी अशक्तपणा तपासणी, गर्भवती महिलांसाठी प्रसूतपूर्व तपासणी व समुपदेशन, माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विषयक जनजागृती या सेवाही महिलांना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच वेळेवर निदान व उपचाराची संधी उपलब्ध झाली. Women’s Health Checkup at Dhopawe