उपस्थितांना मोफत ई-श्रम कार्ड, कापडी पिशव्यांचा वाटप व मोफत आरोग्य तपासणी
गुहागर, ता. 12 : चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत ताम्हणमळा येथे महिला दिन उत्साहात साजरा केला. या महिला दिनानिमित्ताने महिलांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत कापडी पिशव्यांचा वाटप करण्यात आले. ग्रामसेविका सौ. योगिता घाग आणि सरपंच सौ. पूनम घाणेकर यांच्या विचारधारेतून आणि उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. Women’s Day in Tamhanmala


८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान हे सर्व श्रेष्ठ ठरलेले आहे. बदलत्या काळात सुद्धा महिला उच्च पदावर विराजमान होताना आपण अनुभवत आहोत. आज गावाखेड्यातील महिला देखील एकत्र येऊन अनेक उपक्रम राबविताना दिसत आहेत. Women’s Day in Tamhanmala


यावेळी खरवते प्रा. आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर उपस्थित महिलांना मोफत ई-श्रम कार्ड काढून देण्यात आले. त्याच बरोबर ग्रामविकास मंडळ ताम्हणमळा मुंबई यांच्या वतीने गावात प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र यावर जनजागृती करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा ह्या हेतूने मंडळांच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. Women’s Day in Tamhanmala
सदर कार्यक्रमाला खरवते प्रा. आरोग्य केंद्राच्या वैदेकीय अधिकारी डॉ. मयेकर मॅडम, वाघे सिस्टर, माणदेशी फाउंडेशनच्या दीपाली महाडीक, ग्रा.प. सदस्य प्रतिभा तटकरे, सांग्रिका मोहिते, सरिता घाडे, अंगणवाडी सेविका पुजा गुरव, मानसि घाडे, आशा स्वयंसेविका दिपाली गुरव, ज्येष्ठ नागरिक सविता वेलोंडे व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. Women’s Day in Tamhanmala

