• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यक्रम

by Guhagar News
January 24, 2026
in Guhagar
81 1
0
Women empowerment program at KDB College
160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), अंतर्गत महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व सर्वांगीण विकास हा कार्यक्रम दि. २१ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Women empowerment program at KDB College

Women empowerment program at KDB College
मार्गदर्शन करताना गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मा. सौ.नीता मालप आणि व्यासपीठावरील मान्यवर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ .महेंद्र गायकवाड तर प्रमुख पाहुण्या म्हणून गुहागर नगरपंचायतच्या मा. नगराध्यक्षा सौ.नीता मालप मॅडम, तसेच सौ. आरती पवार मॅडम, ॲड. सौ.मनाली आरेकर मॅडम, आंबोकर मॅडम (बचत गट प्रमुख), गुहागर नगरपंचायतच्या नगरसेविका उपस्थित होते. या कार्यक्रमअंतर्गत खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री.विराज महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून मुलांच्या व  मुलींच्या मनात विचारांचा प्रकाश टाकला महिलांचे शिक्षण, आत्मविश्वास, करिअर आणि समाजात स्वतःचे स्वतंत्रस्थान निर्माण करावे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ.श्री. महेंद्र गायकवाड यांनी आपले मनोगत सादर करून मुलींना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. Women empowerment program at KDB College

Women empowerment program at KDB College

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा.डॉ.शीतल मालवणकर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थीनी, गुहागर नगर पंचायत बचतगट सदस्या उपस्थित होते. त्याचबरोबर आलेल्या महिलांचं हळदी-कुंकू साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी रुद्रा जांभळे हिने केले, तसेच चारोळ्याच्या माध्यमातून आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा रांजाणे हिने केले. Women empowerment program at KDB College

Women empowerment program at KDB College
कार्यक्रमअंतर्गत महिलांचे हळदी-कुंकू सभारंभानिमित्त उपस्थित महिला वर्ग

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWomen empowerment program at KDB Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.