• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गावठी बॉम्ब हातात फुटल्याने महिला गंभीर

by Guhagar News
May 19, 2026
in Ratnagiri
196 2
0
Woman Seriously Injured as Bomb Explodes in Her Hands
384
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जांभारी फाटा येथील परिसरात २० ते २५ जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ

रत्नागिरी, ता. 19 :  वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Woman Seriously Injured as Bomb Explodes in Her Hands

काही महिला जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात उचलताच जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून त्या गंभीर भाजल्या आहेत. Woman Seriously Injured as Bomb Explodes in Her Hands

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कुणी आणि कशासाठी ठेवली होती, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. Woman Seriously Injured as Bomb Explodes in Her Hands

जयगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बॉम्ब शोध पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून या धक्कादायक प्रकारामुळे जांभारी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Woman Seriously Injured as Bomb Explodes in Her Hands

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWoman Seriously Injured as Bomb Explodes in Her Handsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share154SendTweet96
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.