• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी शिबिर

by Mayuresh Patnakar
September 30, 2026
in Guhagar
16 0
0
Woman Farmer Certificate
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१४६ हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वरवेली येथे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उपक्रमांतर्गत वरवेली ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी विशेष अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी १४६ हून अधिक महिला शेतकऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. या शिबिराचे उद्घाटन सरपंच नारायण आगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Woman Farmer Certificate

महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण व मार्गदर्शन यांचा लाभ सुलभपणे मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा कृषी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. Woman Farmer Certificate

“महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख, कृषी सेवांपर्यंत सुलभ पोहोच आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.  Woman Farmer Certificate

या शिबिरास मंडळ कृषी अधिकारी नाळे, कृषी पर्यवेक्षक/उप कृषी अधिकारी सोनवणे, वरवेली गावचे सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, सेजल शिंदे, श्रावणी शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, सहाय्यक कृषि अधिकारी खेडेकर, पत्रकार गणेश किर्वे, सुप्रिया देसाई, आशा सेविका दिव्या किर्वे, सुरज पाटील उपस्थित होते. Woman Farmer Certificate

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWoman Farmer Certificateटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.