महावितरण गुहागर, तिघांची बदली बेकायदेशीर असल्याचा दावा
गुहागर न्यूज : महावितरणच्या शृंगारतळी शाखा अंतर्गत तीन वायरमन कर्मचाऱ्यांची बदली केली होती. थकबाकी वसुलीत कसुर केल्याचा ठपका यांच्यावर लावला होता. याचा जाब विचार करण्याकरीता सोमवारी (ता. 6) सकाळपासून 6 कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. मात्र दुपारपर्यंत समाधानकारक चर्चा तालुक्यातील वायरमननी गुहागर महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर कार्यकारी अभियंता चिपळूण यांनी कोणताच निर्णय न दिल्याने उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. Wireman teased the movement
Wireman teased the movement
महावितरण (MSEDCL) च्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शाखेंतर्गत काम करणारे वायरमन विश्वजीत चव्हाण, अल्पेश मोरे आणि किरण बेंदरकर या तिघांची तेथील शाखा अभियंता सचिन कोळेकर यांनी शाखांतर्गत गावात बदली केली. मात्र या बदल्या अन्यायकारक असल्याचे वायरमन यांनी म्हटले आहे. एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अशा बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. असे असताना शाखेतील गावांतर्गत झालेली बदली ही वायरमन यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे सर्व वायरमन यांचे म्हणणे आहे. याचा जाब विचारण्याकरता तीन वायरमनसह संघटनेचे पदाधिकारी यांनी उपकार्यकारी अभियंता गुहागर सुनील सुद यांची भेट घेतली. सकाळपासून याबाबत चर्चा सुरु होती. मात्र त्यावर समाधानकारक तोडगा निघत नव्हता. Wireman teased the movement
वायरमनना न्याय मिळत नसल्याचे संदेश दुपारपर्यंत गुहागर तालुक्यातील अन्य वायरमनपर्यंत पोचले. त्यामुळे अन्याय होणाऱ्या वायरमनना पाठींबा देण्यासाठी दुपारनंतर तालुक्यातील 35 ते 40 वायरमन व कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या गुहागर कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. Wireman teased the movement
उपकार्यकारी अभियंता सुद तटस्थ
याबाबत पत्रकारांनी MSEDCL उपकार्यकारी अभियंता गुहागर सुनील सुद यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत सुद म्हणाले की, प्रभारी शाखा अभियंता सचिन कोळेकर यांच्याजवळ खुलासा मागितला असता ग्राहकांची वीज वसुली थकली असल्याकारणाने व वसुली 100% व्हावी याकरता ही बदली केली असल्याचे सचिन कोळेकर यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात नोटीसीमध्ये बदली करण्यामागील कोणतेही कारण दिलेले नाही. मी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजू ऐकून घेऊन चिपळूणचे कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्याकडे सदर प्रकरणी मार्गदर्शन मागवले आहे. यावरुन या संपूर्ण प्रकरणात उपकार्यकारी अभियंता सुनील सुद हे तटस्थ असल्याचे समोर आले. Wireman teased the movement
कर्मचाऱ्यांची बदली अन्यायकारक
शृंगारतळीतील शाखा कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर यांनी तीन कर्मचाऱ्यांची केलेली बदली अन्यायकारक आहे. वीज वसुलीच्या नावाखाली बदली केली असेल तर गेली दोन वर्षे गुहागर तालुका 100% वीज वसुली झाली आहे. प्रभारी सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर हे वीज वसुली संदर्भात वायरमन यांना कोणते सहकार्य करत नाहीत. मात्र अंतर्गत बदल्या करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये असलेली औद्योगिक शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. शाखेंतर्गत बदली झाल्यावर नवीन कर्मचाऱ्याला तेथील फिडर लाईन समजून घेण्यासाठी, कार्यक्षेत्रातील ग्राहक समजून घेण्यासाठी किमान सहा महिने जातात. त्यानंतरच त्यांच्या कामाचे मुल्यांकन होऊ शकते. हे माहिती असूनही बदलीला दीड महिने झाले असतानाच बदल्या करणे हे अन्यायकारक आहे. असे वर्कर्स फेडरेशन रत्नागिरी मंडळ सचिव महेश डिंगणकर (Maharashtra State Electricity Workers Federation) यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी वर्कर्स फेडरेशन रत्नागिरीचे उपसचिव संतोष आंबावकर, संचालक साई कांबळे तसेच वायरमन कर्मचारी उपस्थित होते. Wireman teased the movement