• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात कडकडीत बंद

by Manoj Bavdhankar
April 10, 2021
in Old News
16 0
0
गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई

गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, पालशेत,  आदी तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या.  शृंगारतळीत दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांवर गुहागर पोलीसांनी कारवाई केली. या बंदमुळे गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनची आठवण पुन्हा एकदा सर्वांना झाली आहे. 
In Guhagar Taluka Shops, Hotels, Public Transport etc Closed on Weekend Lokdown. This Lockdown refreshed the memories of March 2020 Lockdown. In Shringartali Police actioned on private vehicles movement. Overl all Weekend Lockdown Successful in Guhagar Taluka.

गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन
गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

गुहागर तालुक्यात वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद  होती. शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु होती. मात्र या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांखेरीज अन्य कोणीही उपस्थित नव्हते. विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर गुहागर आगाराने ग्रामीण भागातील एस.टी.च्या सर्व फेऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे बसस्थानवर एकही प्रवासी नव्हता. नेहमी वर्दळ असलेल्या बँका, पोस्ट कार्यालयातही शुकशुकाट होता.

Guhagar Bus Stand
गुहागर : नेहमी गर्दी असलेल्या बसस्थानकात आज एकही प्रवासी नव्हता.

व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून विकेंड लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी केला. तरीही गुहागर आणि शृंगारतळीमध्ये तुरळक वाहनांची ये जा सुरु होती. श्रृंगारतळीत हे प्रमाण अधिक होते.

Shringartali Bazarpeth
शृंगारतळी : विकेंड लॉकडाऊन मुळे गर्दीच्या केंद्र स्थानी असलेली शृंगारतळी बाजारपेठही आज बंदच (छायाचित्र सेवा : उमेश शिंदे)

सुरवातीला पोलीस सूचना देवून वाहनचालकांना सोडत होते. मात्र तरीही वाहनांची वर्दळ वाढू लागल्याने अखेर पोलीसांनी कारवाईला सुरवात केली. विनामास्कच्या वाहनचालकांकडून दंड वसुली केली. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणे. ती अपूर्ण असल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे. विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा करणे. अशा कारवाईला पोलीसांनी सुरवात केल्यावर मात्र वाहनांची वर्दळ कमी झाली.

Police in action
Police at shringartali
शृंगारतळी : दुचाकीस्वारांवरही पोलीसांनी उगारला कारवाईचा बडगा (छायाचित्र सेवा : उमेश शिंदे)

तालुक्यातील आबलोली येथेही व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठेतील दुकाने बंद होती. शिवाय वहातूकही पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कायम गजबजलेल्या आबलोली बाजारपेठतही आज शुकशुकाट होता.

abloli bazarpeth
abloli chekpost
आबलोली : येथील बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणारे चेकपोस्ट वरील पोलीस रविंद्र आठवले व होमगार्ड मोहिते (छायाचित्र सेवा : साई लिंगायत)
Tags: Breaking NewsCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarket closedNews in GuhagarNews in MarathiWeekend Lockdownकोरोनाकोरोना बातम्यागुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याबाजारपेठ बंदब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युजविकेंड लॉकडाऊन
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.