• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुरुवारी प्रभाग 17 मध्ये होणार लसीकरण

by Guhagar News
July 7, 2021
in Old News
16 0
0
राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायत : गर्दी टाळण्यासांठी प्रभागनिहाय नियोजन

गुहागर, ता. 07 :  शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरुवारी लसीकरण होणार आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. 1 येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी गुहागर नगरपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने नगरपंचायत क्षेत्रातील उर्वरित प्रभागामध्ये स्वतंत्रपणे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य व स्वच्छता समिती सभापती श्री. अमोल गोयथळे यांनी दिली.         
गुहागर नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने सुरुवातीला नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग 1 ते 17 पैकी काही ठराविकच प्रभागात लसीकरण करण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा जीवन शिक्षण शाळा क्र १ मध्ये लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले. सोमवार दि. 5 जुलैला या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी रांग लावली. सोमवारी सकाळी ही रांग किर्तनावाडी रस्त्यावरील नारायण मंदिरापर्यंत पोचली होती. लसीकरणासाठी झालेली गर्दी आणि मध्यरात्री पासुन रांगेत उभे रहाण्यासाठी नागरिक घेत असलेले कष्ट पाहून नगरपंचायतीने तातडीने नगरसेवकांची सभा बोलावली. या सभेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा प्रभागनिहाय लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाप्रमाणे गुरूवार, दि. 8 जुलै रोजीपासून होणारे शहरातील लसीकरण प्रभागनिहाय होणार आहे. गुरूवार, दि. 8 जुलै रोजी केवळ प्रभाग क्र. 17 मधील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घ्यायचा आहे अशा प्रभाग क्र. 17 मधील १८ ते ६० वयोगटातील नागरिकांनी  हा लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांनी केले आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.