नगराध्यक्ष बेंडल : गोंधळ, गर्दीविना लसीचा होतोय पूर्ण वापर
गुहागर, ता. 13 : लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, वादावादी आणि गोंधळ थांबविण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणचा निर्णय घेतला. आजपर्यंत दोन प्रभागात झालेल्या लसीकरणाने हा निर्णय योग्य असल्याचे समोर आले आहे. 180 लसींमध्ये 193 लसीकरण झाले. अशी माहिती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली. गुहागरमधील नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
The Guhagar Nagar Panchayat decided to conduct ward wise vaccination to stop the crowd, controversy and confusion at the vaccination center. Vaccination in two wards to date has shown that this decision is correct. Of the 180 vaccines, 193 were vaccinated. This information was given by Mayor Rajesh Bendal. The citizens of Guhagar have also welcomed the decision.
जून अखेरपर्यंत गुहागर नगरपंचायतीने शासनाच्या लसीकरण केंद्रातच नगरपंचायत अंतर्गत लसीकरण केले. मात्र कार्यक्षेत्र छोटे असून मध्यरात्रीपासून नंबर लावण्यासाठी होणारी गर्दी, नगरपंचायत कार्यक्षेत्र सोडून येणाऱ्या ग्रामस्थांसोबत होणारी वादावादी, यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे सर्वजण त्रासले होते. नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी तातडीने नगरसेवकांची सभा घेवून प्रभागनिहाय लसीकरणाचा निर्णय घेतला. प्रभाग क्र. 17 पासून लसीकरणाला सुरवात झाली. गुरुवारी 8 जुलैला प्रभाग 17 मध्ये 84 जणांनी लस घेतली. तर सोमवारी 12 जुलैला प्रभाग 16 मध्ये 109 जणांनी लस घेतली.
या नियोजनाबाबत नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की प्रभाग निहाय लसीकरण करताना नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने आम्ही लस देत आहोत. संबंधित प्रभागातील नागरिकांना पहिला डोस उपलब्ध करुन देत आहोत. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक वय वर्ष 18 वरील एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची यादी बनवून त्यांना निरोप देत आहेत. त्यामुळे गडबड, गोंधळ, गर्दीविना लसीकरण उत्तमप्रकारे होत आहे.
नगरपंचायतीच्या या निर्णयाचे गुहागरकरांनीही स्वागत केले आहे. सुहास सातार्डेकर, मनिष खरे आणि संदेश पाटणे यांनी प्रभाग निहाय लसीकरणाचेच नियोजन करावे. त्या त्या भागातील नागरिकांच्या मदतीमुळे नगरपंचायतीचा ताण हलका होतो तसेच लसीकरणही वेगाने होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
वॉड क्रमांक 17 व 16 मधील लसीकरण आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी खालीली व्हिडिओ पहा