गुहागर, ता. 07 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील वाघ बारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाघबारशी हा गुराख्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या गुरांचं संरक्षण व्हावं, गुरांना सुख, समाधान मिळावं, रानात कुठलीही अडचण येऊ नये, म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्या नंतर सर्व गुरे चरायला सोडून देतात अगदी मे महिन्यात पर्यंत तर तू रक्षण कर, अशी आराधना करून वनभोजन करून सांगता केली जाते. ‘Wagh Barshi’ program at Tavasal

संपूर्ण वाडीतील लहान मुलांन पासून ते मोठ्या वयोवृद्धांन पर्यंत ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरून युवक, तरूणी मोठ्या उत्साहात संख्येने उपस्थित असतात. जेवनाची तयारी करताना वाघ पिटळणे यासाठी रंगरंगोटी केली जाते. छोट्या मुलांना जंगली प्राणी बनवितात, अंगावर कमरेभोवती झाडाची पाने, भाताचा पेंडा, डहाळ्या लावून सजून गुराख्यांच्या देवाला नैवेद्य दाखवल्या नंतर वाघाला शिमेच्या बाहेर पिटाळून लावले जाते. देवाला गान्हाने घालण्यात येत. शेवटी नदीत आंघोळ करून सर्वजण आनंद लुटतात. ‘Wagh Barshi’ program at Tavasal

यावेळी तवसाळ बाबरवाडी मधील प्रतिष्ठीत ग्रामस्थ अध्यक्ष संदीप जोशी, शंकर येद्रे, विजय नाचरे, गणपत येद्रे, मोहन येद्रे, यशवंत नाचरे, गणू येद्रे, अशोक नाचरे, आनंद येद्रे, दिपक येद्रे, दिपक जोशी, ज्ञानेश रसाळ, सचिन येद्रे, अविनाश नाचरे, सुरेश येद्रे, सुरेश नाचरे, ग्रामस्थ महिला मंडळ यांचा मोठा सहभाग दिसून आला. अशारीतीने वाघबारशी निमित्ताने ग्रामीण व कोकणची संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न करण्यात आला. ‘Wagh Barshi’ program at Tavasal
