• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 March 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

व्याडेश्वर महोत्सवाला प्रेक्षकांची तुफान गर्दी

by Guhagar News
February 20, 2026
in Guhagar
86 1
0
Vyadeshwar Festival
169
SHARES
484
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : गुहागर पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खास खेळण्यांचे आकर्षण, विनोदी आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे सूत्रसंचालन यामुळे या महोत्सवात आणखीनच रंगत आणली. Vyadeshwar Festival

Vyadeshwar Festival

दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात क्रियाशीलपणे काम करणाऱ्या श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  तसेच स्थानिक व पर्यटकांच्या करमणुकीसाठी व्याडेश्वर महोत्सवाचेही आयोजन केले जाते. यावर्षी हे व्याडेश्वर महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. देवस्थानने व्याडेश्वर महोत्सवाचे आयोजन करून तमाम स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून  दिले आहे. Vyadeshwar Festival

Vyadeshwar Festival

या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. नीता मालप यांच्या हस्ते झाले.  स्थानिक कलाकारांना महोत्सवात विविधांगी नृत्य सादर करण्याची संधी देवस्थानने उपलब्ध करून दिली आहे. देवस्थानने आपल्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यातही देवस्थानचा मोठा वाटा आहे. महोत्सवात रेकॉर्ड डान्स, नमन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. Vyadeshwar Festival

Vyadeshwar Festival

अलाक्यू स्टॅच्यू स्टॅचू ग्रुप ऑफ बांदा यांच्यावतीने गेले तीन दिवस स्टॅच्यू राहून प्रक्षकांची मने जिंकली.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, विश्वस्त अमरदीप परचुरे, कृपाल परचुरे, संदीप बारटक्के, सिध्दीविनायक जाधव, गजानन मोरे, अभिजीत गोळे,  सचिन मुसळे, मनीष कामेरकर, केदार खरे यांचे योगदान लाभले. तसेच या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी सूत्रसंचालक जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, दीपक देवकर, प्रा. मनाली बावधनकर, निलेश गोयथळे यांनी पुढाकार घेतला. Vyadeshwar Festival

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVyadeshwar Festivalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.