राजकीय पक्षांच्या बैठकीत मतदान केंद्र सुसुत्रिकरणाची माहिती
रत्नागिरी, ता. 10 : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थित आज झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण या विषयी माहिती देण्यात आली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. 5 विधानसभा मतदार संघांमधील मतदान केंद्रातील प्रस्तावित बदलांच्या तपशिलामध्ये प्रसिध्द यादीनुसार होणाऱ्या मतदान केंद्राच्या संख्येत कोणताही बदल नाही. 1300 पेक्षा जास्त मतदार होत असल्यास दुसरे मतदान केंद्र करणे अथवा कमी मतदार केंद्रात समायोजन करणे असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. Voter List Special Revision Program
यानुसार 263-दापोली मतदार संघात 167 पंढरी या मतदान केंद्रातील तुरेआळी हा विभाग काढून 165 – पंढरी या केंद्राला जोडण्यात आलेला आहे. 171 हर्णे मतदान केंद्रातून क्रिश्चनआळी, बौध्दवाडी हे दोन विभाग काढून 174-हर्णे या मतदान केंद्राला जोडण्यात आले आहेत. 156-वणौशी त.नातू या मतदान केंद्राला जोडलेले सर्व मतदार व मतदार क्षेत्र हे सोंडेघर या महसुली गावातील असल्याने 156-या केंद्रास सोंडेघर हे नाव देण्यात येत आहे. 265-चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये जुनी इमारत मोडकळीस आल्याने मतदान केंद्राच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. यात 9 -पेढे कोष्टेवाडी, 139-शिरगाव, 140-शिरगाव, 248-कसबा . जुन्या इमारतीची शाळा बंद झाल्याने 21-तिवडी तर सध्याच्या मतदार संघाचे अंतर लांब असल्याने 94-खडपोली हे मतदान केंद्र आहे. 266-रत्नागिरी इमारत निर्लेखित झाल्यामुळे मतदान केंद्र स्थळास बदल झाला आहे. मतदान केंद्राचे नाव रत्नागिरी नगरपरिषद वॉर्ड क्र.8, रत्नागिरी नगरपरिषद वॉर्ड क्र.9. 267-राजापूर इमारत निर्लेखीत झाल्यामुळे 329-प्रिंदावन मतदान केंद्र स्थळात बदल झाला आहे. Voter List Special Revision Program
या बैठकीला प्रशांत साळुंखे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), राजाराम रहाटे (शिवसेना -उध्दव बाळासाहेब ठाकरे) सुफियान जयगडकर (शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे), सनीफरखान गवाणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पाटी- शरद पवार) राहुल पंडित (शिवसेना), दिलावर गोदड ((शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रशांत सुर्वे (शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे),ओंकार फडके (भारतीय जनता पार्टी). खलील वस्ता (आम आदमी पार्टी) सलील डाकवे (शिवसेना -उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपस्थितीत होते. Voter List Special Revision Program