• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

by Manoj Bavdhankar
August 13, 2021
in Old News
16 0
0
निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम Voter List Special Revision Program जाहीर केला आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :
9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्रुटी दूर करणे,
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) कडून घरोघरी तपासणी/पडताळणी,
योग्यप्रकारे विभाग/भाग तयार करणे,
मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे.
या कार्यक्रमानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून सदर मतदार यादीवर हरकती व दावे दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सादर करता येणार आहेत. या कालावधीत प्राप्त हरकती व दावे हे 20 डिसेंबर, 2021 पर्यंत निकाली काढून त्यावर निर्णय घेण्यात येईल व अंतिम मतदार यादी 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
मतदार यादीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रामुख्याने पुढीलप्रमाणे नमुने वापरले जातात.
मतदार यादीत नाव दाखल करणे यासाठी नमुना ६,
अनिवासी भारतीयाचे नाव मतदार यादीत दाखल करणे यासाठी नमुना ६अ,
मतदार यादीतील नाव वगळणे यासाठी नमुना ७,
मतदार यादीतील मतदाराचे तपशिलात दुरुस्ती करणे साठी नमुना ८,
मतदाराचा निवास बदलल्यास विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भाग बदलणे साठी ८अ,
हरकती व दावे सादर करण्यासाठी उक्त नमुना अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. दावे व हरकतीबाबत मतदार नोंदणीचे ऑफलाईन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा BLO मार्फत सादर करण्यात यावेत, किंवा ऑनलाईन अर्ज www.nvsp.in या संकेत स्थळावर व Voter Helpline या Mobile App वर देखील सादर करता येतील. तरी सर्व नागरिकांनी या पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेवून रत्नागिरी जिल्हयाची मतदार यादी अचूक व सुदृढ होणेसाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

Tags: Breaking NewsElection CommissionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiRevionVoterVoter Listटॉप न्युजताज्या बातम्यानिवडणूक आयोगपुनरिक्षणब्रेकिंग न्युजमतदारमतदार यादीमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.