बीसीसीआय : कोविडच्या संकटामुळे निर्णय
गुहागर, ता. 04 : बायो बबल सुरक्षा फोडून कोरोना खेळाडूंपर्यंत पोचल्याने अखेर इंडियन प्रिमिअर लिग पुढे ढकलल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आयपीएलच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या आरोग्याशी तडजोड करण्याची इच्छा नाही. म्हणून स्पर्धा पुढे ढकलत असल्याचे आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रसिध्द करण्यात आले आहे. (The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season, with immediate effect.)
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे गोलंदाजी प्रशिक्षण बालाजी आणि कोलकत्ता नाईट रायडरचे गोलंदाज संदिप वरियार आणि वरुन चक्रवर्ती यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे सोमवार, 3 मे ला होणारा कोलकत्ता विरुध्दची चेन्नई हा सामना रद्द करावा लागला होता. आज मंगळवारी (ता. 4 मे) सनरायर्झस् हैद्राबाद संघातील खेळाडू वृद्धमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्स् संघाचा गोलंदाज अमित मिश्रा हे दोघेही कोरोनाग्रस्त झाले.
या पार्श्र्वभुमीवर मंगळवारी सकाळी बीसीसीआयने तातडीने मिटींग बोलावली. यामध्ये आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अधिकृत घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली. आमच्यासाठी आयपीएलशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करु शकत नाही. कोरोनाच्या वातावरणातून बाहेर पडून देशवासीयांचे क्रिक्रेटद्वारे मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत होतो. परंतु दिवसेंदिवस परिस्थितीत कठीण होत आहे. अशा काळात खेळाडु, सपोर्ट स्टाफ आदी सर्वांनीच कुटुंबासोबत, प्रियजनांसोबत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकृत प्रसिध्दी माध्यमे, संघ मालक या सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
The BCCI does not want to compromise on the safety of the players, support staff and the other participants involved in organising the IPL. This decision was taken keeping the safety, health and wellbeing of all the stakeholders in mind. These are difficult times, especially in India and while we have tried to bring in some positivity and cheer, however, it is imperative that the tournament is now suspended and everyone goes back to their families and loved ones in these trying times.