गुहागर, ता. 26 : शनिवारी (27 november) सकाळी अडूर बुधल आणि सायंकाळी गुहागर या मार्गावर 60 विंटेज बाईक धावणार आहेत. कोकण हेरिटेज रायडर ग्रुप तर्फे कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी. म्हणून या उपक्रम करण्यात येत आहे. अशी माहिती प्रविण रणपिसे यांनी दिली आहे. (Vintage Bike Rally) 60 Bike Riders from various states came to Hotel Shantai with Vintage Bikes like classic YAZDI, Java, Bullet. Konkan Heritage Tour will be flagged off by Host Nilesh Patil, a former soldier, on Saturday (27th November) 10.30 A.M.
या मोहिमेमध्ये क्लासिक एझडी, जावा, बुलेट यासारख्या दुचाकींचा समावेश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमधील आदी राज्यातील 60 दुचाकीस्वार आज गुहागरमधील शांताई रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहे. शनिवारी सकाळी ऑपरेशन विजय मध्ये सहभागी असलेले माजी सैनिक निलेश पाटील यांच्या हस्ते या मोहिमेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
कोकण हेरिटज रायडर ग्रुपचे प्रमुख प्रविण रणपिसे म्हणाले की, आमच्या ग्रुपमध्ये विविध राज्यातील दुचाकीस्वार जोडले गेले आहेत. आजपर्यंत कन्याकुमारी, हिमाचल प्रदेशमधील अटल टनेल, लद्दाख, भुतान, नेपाळ, सिक्कीम, मेघालय असा अनेक राज्यातील हजारो किलोमिटर पर्यंतचा दुचाकी प्रवास आमच्या ग्रुपने अनेकवेळा केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात बाईक रॅलीद्वारे कोरोनाबाबत जनजागृतीचे काम केले आहे. विविध राज्यात दुचाकीने फिरताना स्वाभाविकच तेथील निर्सग सौदर्यांबरोबर जनजीवनही न्याहाळता येते. प्रवासाहून आल्यावर प्रत्येक बाईकस्वार आपल्या परिवारात, मित्रांमध्ये या प्रवासाचे वर्णन सांगतो. सामाजिक माध्यमांवर आपले अनुभव मांडतो. त्यातून संबंधित पर्यटनस्थळाची माहिती अनेकांपर्यंत पोचले. गुहागर म्हणजे निर्सर्गाची मुक्त उधळण. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, मंदिरे, ग्रामीण जीवन, या गोष्टी म्हणजे पर्यटकांसाठी खजिना आहे. हा खजिना पहाण्यासाठी विविध राज्यातील 60 दुचाकीस्वार आज गुहागरमध्ये आले आहेत.
शनिवारी सकाळी 10.30 वाजता आमच्या कोकण हेरिटेज मोहिमेचे औपचारीक उद्घाटन हॉटेल शांताईमध्ये होईल. त्यानंतर सर्व बाईकस्वार अडूर बुधल येथे जाणार आहेत. सायंकाळी 4.30 वा. आम्ही गुहागर खालचापाट येथील 106 वर्ष जुनी वास्तू पहाण्यासाठी येणार आहोत. आजही कोकणात अशी रचना असलेली अनेक घरे आहेत. मात्र शहरातील लोकांना या घराची रचना माहिती नाही. त्यामुळे पूर्वीचे तबलावादक वासुदेव खरे (सध्या हे घर पुण्यातील प्रकाश देशपांडे यांनी घेतले आहे. ) यांचे घर आणि परिसराची माहिती ( कोकणातील घरांची रचना – ओटी पडवी, माजघर, बाळंतिणीची खोली, स्वयंपाक घर, मागील परसाव) देण्यात येणार आहे. त्यानंतर गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत.
कोकण हेरिटेज रायडर ग्रुपचे सदस्य समीर सोनार म्हणाले की, या उपक्रमामुळे गुहागरमधील विविध पर्यटनस्थळांची माहितीचा प्रचार प्रसार होईल. येथील संस्कृती विविध राज्यातून आलेल्या दुचाकीस्वारांना कळेल. हा उद्देश आहे.
तर जयंत पाखोडे म्हणाले की, जुन्या काळातील बाईक, कार सांभाळण्यांची आवड अनेकांना असते. योग्य देखभाल केली तर ही वाहने आजही रस्त्यावर धावतात. ही वाहने जुनी झाली असली तरी त्यांचे सौदर्य वेगळे आहे. आमच्या ग्रुपमधील अनेक सभासदांकडे जुन्या दुचाकींबरोबरच जुन्या कार, मॅटेडॉर (एफ 307) अशी वाहने आहेत. असा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींना, किंवा आवड असणाऱ्यांना आजच्या उपक्रमामुळे पुन्हा जुनी वाहने पहाण्याची संधी मिळणार आहे.