• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारी मोहल्ल्यात श्रमदानातून बांधला बंधारा

by Mayuresh Patnakar
October 20, 2026
in Guhagar
28 1
0
Villagers unite to overcome water scarcity
56
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र

गुहागर, ता. 20 : एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘मिशन बंधारे’ ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत गावागावात बंधारे बांधण्याची मोहीम तीव्रतेने राबवली जात असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज शृंगारतळी येथील शृंगारी मोहल्ला येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. Villagers unite to overcome water scarcity

​या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. हारून घारे यांनी भूषवले, तर बंधारा उभारणीचे सर्व नियोजन ग्रामपंचायत पाटपन्हाळे, जमातुल मुस्लिमीन शृंगारी व उपसरपंच आसिम साल्हे यांनी केले होते. ​यावेळी गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, उपसरपंच आसिम साल्हे, ग्रामपंचायत सदस्य रियाज ठाकूर, चंद्रकांत तेलगडे, शृंगारी जमातीचे सिराज घारे, सिद्दीक घारे, यासिन घारे तसेच ग्रामविस्तार अधिकारी सौ.बडद यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय परिसरातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. गावातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. Villagers unite to overcome water scarcity

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVillagers unite to overcome water scarcityटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.