गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत. ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. अखेर नव्याने येथील कार्यभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंता फर्नांडिस यांच्यासमोर तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी येथील गलथान कारभाराचा पाढा वाचला. लवकरात लवकर कारभारात सुधारणा न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन कार्यालयाला ग्रामस्थ टाळे लावतील, असा सक्त इशारा यावेळी देण्यात आला. https://guhagarnews.com/the-emergency/


गेले कित्येक दिवस वादळ, पाऊस नसताना देखील येथील पंचक्रोशीतील गावांमध्ये सातत्याने रात्रीच्या वेळी वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो. मात्र याकडे लक्ष देण्यास महावितरणला वेळच नसल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा याबाबत पंचक्रोशीतील काही ग्रामस्थांनी तळवली महावितरण कार्यालयात तक्रारी केल्या होत्या तर काही वेळा प्रत्यक्ष भेटूनही येथील कारभारात कोणतीच सुधारणा झालेली नाही. अखेर पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी नव्याने पदभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंत्याना येथील गलथान कारभाराचा पाढाच जणू वाचून दाखविला. https://guhagarnews.com/the-emergency/


यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जडयाळ यांनी येथील एकूणच कारभाराबाबतची माहिती नवीन अधिकारी यांना दिली. त्यानंतर पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील प्रतिनिधीनी आपल्या गावातील समस्या मांडल्या. यावेळी श्री. फर्नांडिस यांनी आपण लवकरच येथील कारभारात सुधारणा करू, असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले. https://guhagarnews.com/the-emergency/