• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 September 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी विजय मोहिते

by Mayuresh Patnakar
September 12, 2026
in Guhagar
42 1
0
83
SHARES
237
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : संजय गांधी निराधार योजना समितीच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय जनार्दन मोहिते यांची निवड पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काताळे तवसाळ तसेच गुहागर तालुक्यातील नागरिकांकडून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. Vijay Mohite, President of Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार, गरजू, आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल तसेच शासनाच्या मदतीची आवश्यकता असलेल्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या समितीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी आता विजय मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजय मोहिते यांनी आपल्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिल्याबद्दल पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेक, आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तालुक्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. Vijay Mohite, President of Sanjay Gandhi Niradhar Yojana

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPresident of Sanjay Gandhi Niradhar YojanaVijay Mohiteटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share33SendTweet21
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.