व्याघ्रांबरी समुहाचा आदर्श घेवून गांडूळ खताचे प्रकल्प उभारावेत – केळस्कर
गुहागर, ता. 26 : गेली १७ वर्ष बचत समुहाचा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असलेल्या व्याघ्रांबरी बचत समुहाचं कौतुक करत या बचत समुहाचा आदर्श व मार्गदर्शन घेवून गांडूळ खताचे प्रकल्प उभे राहावेत. त्यासाठी पंचायत समितीच्या कृषी व राष्ट्रीय ग्रामिण जिवनोन्नती अभियान विभागाचे कायम सहकार्य राहील, असेही अभिवचन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी यावेळी दिले. Vermicompost demonstration at Asgoli


गुहागर पंचायत समिती कृषी विभाग व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने असगोली येथील व्याघ्रांबरी बचत गटाच्या गांडूळ खत प्रकल्पावर आयोजित ‘हळद लागवडीत गांडूळ खताचा वापर’ व ‘गांडूळ खताचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. Vermicompost demonstration at Asgoli
यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या सोबत कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राहिला बोट, नरेगाच्या तांत्रिक अधिकारी नयना जाधव व्याघ्रांबरी बचत समुहाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर, रंजना कावणकर, वाळुकेश्वर समुहाच्या अध्यक्षा स्मिता बागकर इ. उपस्थित होते. Vermicompost demonstration at Asgoli


यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनीही व्याघ्रांबरी बचतसमुहाचं कौतुक करताना सांगितले कि, गेली १७ वर्ष या बचत समुहाचा हा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. या बचत समुहाचा आदर्श व मार्गदर्शन घेवून आपल्याला आरे, वेळंब, कोतळूक, कौंढर काळसूर येथे ३-४ गांडूळ खताचे प्रकल्प उभे राहावेत. त्यासाठी पंचायत समितीच्या कृषी व राष्ट्रीय ग्रामिण जिवनोन्नती अभियान विभागाचे कायम सहकार्य राहील, असेही अभिवचन श्री. केळस्कर यांनी यावेळी दिले. कृषी अधिकारी आर.के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचबरोबर गांडूळ खत तयार होणे, खत चाळणे व विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. Vermicompost demonstration at Asgoli


यावेळी आरे येथील स्वामी समर्थ बचत समुह, कौढर काळसूर येथील वाघजाई देवी बचत समुह, महाकाली व इतर बचत समुहातील महिलांनी प्रशिक्षण घेतले. यावेळी बचत समुहातील विजया कोळंबे, अनिता कावणकर, मनाली कावणकर, रत्नप्रभा रामाणे, सुप्रिया घाणेकर, श्रेया कोळंबे, अनुष्का घाणेकर, सानिका घाणेकर, कल्पना कावणकर, मयुरी कावणकर, शिल्पा कावणकर या बचत समुहातील महिलांनी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी गुलाब पुष्प देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन आर.के.धायगुडे यांनी केले. Vermicompost demonstration at Asgoli