विद्यार्थ्यांना मिळाले जाळे विणण्याचे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण
गुहागर, ता. 04 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेत नुकतीच संपन्न झाली. क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना जाळे विणण्याचे प्रशिक्षण मिळाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये स्थानिक पारंपारिक व्यवसाय यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. Veldur Nawanagar School gave a field visit
वेलदूर नवानगर गावामध्ये अनेक छोटे मोठे मच्छीमार व्यावसायिक आहेत. त्यांच्या स्वतःच्या यांत्रिक बोटी व होड्या आहेत. नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंद असते, त्यावेळी छोटे मोठे मच्छीमार व्यावसायिक फिशिंगच्या वेळी जी जाळी फाटलेली असतात ती विणण्याचे काम करत असतात. वेलदूर नवानगर शाळेने स्थानिक पारंपारिक व्यवसायाचे महत्त्व ओळखून श्री गोपाळ महादेव रोहीलकर यांच्या जाळी विणण्याच्या लघु उद्योगाला भेट दिली व मच्छीमारी व्यवसायात जाळे विणणे किती कौशल्याचे व महत्त्वाचे काम असते हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतले. Veldur Nawanagar School gave a field visit


त्यावेळी बोलताना गोपाळ रोहीलकर म्हणाले की, आपणाला मच्छीमारी व्यवसायाचा पन्नास वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून मच्छीमारी व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या नशिबाप्रमाणे आपल्या वाट्याला मच्छी येत असते. सदर व्यवसायात अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. जाळे वेळच्या वेळी दुरुस्त करणे खूप महत्त्वाचे आहे. या जाळ्यामध्येच पापलेट, सुरमई, बांगडे असे विविध प्रकारचे मुबलक मासे समुद्रामध्ये सापडत असतात. मच्छीमारी व्यवसाय हा अत्यंत मेहनतीचा व्यवसाय आहे. Veldur Nawanagar School gave a field visit
जाळे विणण्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच बाजारात उपलब्ध आधुनिक जाळ्यांमुळे स्थानिक मच्छीमार उद्योजकांमध्ये स्पर्धेचे वातावरण तयार होते. मच्छीमारी व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची ताकद आहे. तरुणाने मच्छीमारी व्यवसायाचे आर्थिक गणित समजून घ्यावे व स्वतःचा कौशल्य पूर्वक सर्वांगीण आर्थिक विकास साधावा. असे त्यांनी आवाहन केले. Veldur Nawanagar School gave a field visit


क्षेत्रभेटीच्या वेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षिका अंजली मुद्दामवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. क्षेत्रभेटीचे आयोजन मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. Veldur Nawanagar School gave a field visit