गुहागर, ता. 18 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये शिकणारी वेदश्री अभय साटले ही विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत तालुक्यात पहिली आहे. वेदश्रीला 99.60 टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे गुहागर शहरवासीयांनी कौतुक केले आहे.
Vedashree Abhay Satle, a student of Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir in the city, is the first in the taluka to appear for the Class X examination. Vedashree has got 99.60 percent marks. Her success has been appreciated by the people of Guhagar.
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर (Guhagar Highschool) गुहागरमधील 186 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला (SSC Board Exam) बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शहरातील किर्तनवाडी येथे रहाणारी वेदश्री अभय साटलेला 99.60 टक्के गुण मिळाले. अवघ्या 0.40 टक्के गुण न मिळालेल्या 100 टक्के गुण मिळविण्याची संधी हुकली आहे. वरचापाट येथे रहाणारी तन्वी उमेश राऊत ही विद्यार्थीनी गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदीरमध्ये द्वितीय आली आहे. तिला 97.60 टक्के गुण मिळाले. तर याच शाळेत शिकणारा शृंगारतळीचा मयुरेश दिपक जावरे 95.60 टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय आला आहे.
गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक, शाळा समिती, मुख्याध्यापक आडेकर सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेदश्री, तन्वी, मयुरेशसह 10 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल मुख्याध्यापक आडेकर सर यांनी सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे. कोरोनाच्या काळात, ऑफ लाइन शाळा नसतानाही शिक्षकांनी ऑनलाइन वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले. अशा वेगळ्या धर्तीच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनीही जुळवून घेतले. त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशी प्रतिक्रिया आडेकर सर यांनी व्यक्त केली.