पहिल्यात महिन्यात ५,७६,२९६ रु. उत्पन्न हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे वरवेली येथील १ मेगावाट क्षमतेच्या प्रकल्पातून सप्टेंबर २०२६ पासून वीज विक्रीला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच महिन्यात या प्रकल्पाने १,३५,५९९ युनिट्सची निर्मिती करून ५,७६,२९६ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील मौजे गोळप येथे १ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ पासून कार्यान्वित आहे. या प्रकल्पाने ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या २४ महिन्यांच्या काळात एकसलग भलीमोठी कामगिरी केली असून या कालावधीत गोळप प्रकल्पातून एकूण २३ लाख ९५ हजार १० किलो व्होल्ट विजेची निर्मिती झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांचा मिळून सप्टेंबर २०२६ अखेर जमा झालेला हा मोठा निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. Varveli Solar Power Project
सूर्याची किरणे आता केवळ प्रकाशच देत नाहीत, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला आणि तिजोरीला एक नवी ऊर्जा आणि आर्थिक बळ पुरवत आहेत. मौजे गोळप आणि मौजे वरवेली येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांनी हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती करत उत्पन्नाचा नवा विक्रम रचला आहे. या दोन्ही प्रकल्पांना आतापर्यंत तब्बल १ कोटी ६ लाख ८३ हजार ७७९ रुपयांची घसघशीत कमाई झाली असून, ग्रामीण भागातील हा ऊर्जा प्रकल्प पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिकदृष्ट्या अतिशय यशस्वी ठरत आहे. Varveli Solar Power Project
ग्रामीण भागातून पर्यावरणपूरक पद्धतीने मिळणारे हे आर्थिक उत्पन्न जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पाडत आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या या प्रकल्पांमुळे हरित ऊर्जेचे महत्त्व पटवून देत शाश्वत विकासाचा एक नवा पायंडा रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे पाडला गेला आहे. Varveli Solar Power Project
