गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मासू येथे वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रम उपासक आणि उपासिकांच्या भव्य उपस्थित पार पडला. भारतीय बौद्ध महासभा संघटनेचे शिक्षक विकास पवार ( केंद्रीय शिक्षक ) यांनी उपस्थितांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती लढे या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा मासू यांच्यावतीने करण्यात आले होते. Varshavas Dhamma Prachavan program at Masu
प्रवचनकार विकास पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. जातीव्यवस्थेचे चटके सोसत आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. भारतातील ” जाती त्यांची उत्पत्ती घडण व विकास ” हा निबंध १९१६ रोजी कोलंबिया युनव्हर्सिटीमद्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम केलेली क्रांतीची सुरुवात होय. प्रथमच बहुजन, शोषित, वंचित समाजाच्या हक्कासाठी वृत्तपत्रातून समाजहितासाठी १९२० साली ‘ मूकनायक ‘ हे वृत्तपत्र सुरू केले. २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सर्व समाजासाठी पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला. धर्मांध शक्तीला धडकी बसवणारी पाण्याची क्रांती केली. वंचिताना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. स्वतंत्र मतदार संघाची मागणी, अनाथ अस्पृश्य मुलींचे वसतिगृहाची स्थापना, अस्पृश्य महिला समता दलाची स्थापना ३० एप्रिल १९४० रोजी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा संदेश समाजास दिला.रक्ताचा एक ही थेंब न सांडता लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि दिली आणि जगातील सर्वात मोठी क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आपण उच्च शिक्षण घेऊन, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नती साठी कसा करता येईल हे आजच्या तरुणाईने याचा विचार करावा. असे ही ते म्हणाले. Varshavas Dhamma Prachavan program at Masu
वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा संघटनेचे तालुकाध्यक्ष विद्याधर कदम, तालुका सचिव जितेंद्र जाधव, समता सैनिक – समिर जाधव ( संस्कार विभाग ),बौद्ध उपासक सचिन पवार, भारतीय बौद्ध महासभा गाव संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार, सचिव सुमेध पवार, समिर पवार, दिलीप पवार तसेच कुडली, सडेजांभारी, आबलोली, शिर , दोडवली येथून अनेक उपासक आणि उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाव संघटनेचे सचिव सुमेध पवार यांनी केले. Varshavas Dhamma Prachavan program at Masu