नळपाणी योजना व भाजीपाला कडधान्य पिकासाठी उपयोग
गुहागर, ता. 11 : पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाच्या ‘मिशन बंधारे’ मोहीमेंतर्गत दिपावलीच्या शुभमुहूर्तावर श्रमदान करत ग्रामपंचायत वेळंबच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधा-याचा उपयोग नदीशेजारी असलेल्या नळपाणीयोजेच्या विहीरीसाठी तसेच भाजीपाला, कलिंगड व कडधान्य या पिकांसाठी होणार आहे. Vanrai dam constructed at Velamb
मागच्या वर्षी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम जानेवारी महिन्यात केले होते. मात्र जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार साहेब व पं.स.गुहागरचे गट विकास अधिकारी श्री.जाधव व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी नोव्हेंबर मध्येच ग्रामपंचायत वेळंबच्या कार्यक्षेत्रात या पाण्यासाठी श्रमदानाच्या मोहीमेचा शुभारंभ केला आहे, असे यावेळी सरपंच सौ. समिक्षा बारगोडे यांनी सांगितले. Vanrai dam constructed at Velamb
यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, सर्जेराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, सुरेश जाधव, सौ. श्वेताली घाडे, सौ. जयश्री जाधव, सौ. वैष्णवी घाडे, ग्रामविकास अधिकारी एम. के. पांचाळ, वेळंबचे पोलिस पाटिल स्वप्निल बारगोडे, घाडेवाडीचे पोलीस पाटिल अनिल घाडे, अंगणवाडी सेविका सौ. प्रणाली कुंभार, सौ. उर्मिला माळी, सौ. पंकजा निर्मळ, सौ. स्वप्नाली तांबे, कातळवाडी ग्रामस्थ अनिल रहाटे आणि महिला मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन पागडे यांनी यावेळी श्रमदान केले. Vanrai dam constructed at Velamb