• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळंब येथे बांधला वनराई बंधारा

by Manoj Bavdhankar
November 11, 2023
in Guhagar
139 2
0
Vanrai dam constructed at Velamb
273
SHARES
781
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नळपाणी योजना व भाजीपाला कडधान्य पिकासाठी उपयोग

गुहागर, ता. 11 : पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाच्या ‘मिशन बंधारे’ मोहीमेंतर्गत दिपावलीच्या शुभमुहूर्तावर श्रमदान करत  ग्रामपंचायत वेळंबच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला.  या बंधा-याचा उपयोग नदीशेजारी असलेल्या नळपाणीयोजेच्या विहीरीसाठी तसेच भाजीपाला, कलिंगड व कडधान्य या पिकांसाठी होणार आहे. Vanrai dam constructed at Velamb

मागच्या वर्षी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम जानेवारी महिन्यात केले होते. मात्र जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार साहेब व पं.स.गुहागरचे गट विकास अधिकारी श्री.जाधव व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी नोव्हेंबर मध्येच ग्रामपंचायत वेळंबच्या कार्यक्षेत्रात या पाण्यासाठी श्रमदानाच्या मोहीमेचा शुभारंभ केला आहे, असे यावेळी सरपंच सौ. समिक्षा  बारगोडे यांनी सांगितले. Vanrai dam constructed at Velamb

यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, सर्जेराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, सुरेश  जाधव, सौ. श्वेताली घाडे, सौ. जयश्री  जाधव, सौ. वैष्णवी  घाडे, ग्रामविकास अधिकारी  एम. के. पांचाळ, वेळंबचे  पोलिस पाटिल स्वप्निल बारगोडे, घाडेवाडीचे पोलीस पाटिल अनिल घाडे, अंगणवाडी सेविका सौ. प्रणाली  कुंभार, सौ. उर्मिला  माळी, सौ. पंकजा निर्मळ, सौ. स्वप्नाली  तांबे, कातळवाडी ग्रामस्थ अनिल रहाटे आणि महिला मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी  नितीन पागडे  यांनी यावेळी श्रमदान केले. Vanrai dam constructed at Velamb

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVanrai dam constructed at Velambटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.