गुहागर, ता. 13 : भविष्यातील भीषण पाणी टंचाई, खालावलेली भूजल पातळी आणि येणाऱ्या दुष्काळाचे सावट ओळखून वेळीच सतर्क झालेल्या कुंभारवाडी ग्रामस्थांनी एक अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. पाळीव सोमवारचे औचित्य साधून गावातील तरुणांनी एक-दोन नव्हे तर तब्बल सात ठिकाणी मातीचे बंधारे बांधून पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. Vanrai check dams at Palpene
या उपक्रमात श्री ओम सत्यनारायण नवतरुण मित्र मंडळ यांनी 4 बंधारे, श्री सन्मित्र लोककला मित्र मंडळ यांनी 2 बंधारे आणि श्री वरदान देवी नवतरुण मंडळ, देऊळवाडी यांनी १ बंधारा असे एकूण सात बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.भविष्यातही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अशाच प्रकारचे सखोल आणि विविध उपक्रम राबवून आपला गाव पाण्याने कायम समृद्ध कसा राहील, यासाठी आपणा सर्वांचे असेच सहकार्य अपेक्षित आहे. Vanrai check dams at Palpene
या उपक्रमाला पंचायत समिती सभापती श्री. प्रणव पोळेकर, उपसभापती श्री. निलेश सुर्वे आणि शृंगारतळी पंचायत समिती सदस्य श्री. गौरव वेल्हाळ, कोतलुक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांचे मनापासून कौतुक केले. सभापती श्री प्रणव पोळेकर आणि उपसभापती श्री निलेश सुर्वे यांनी पाणी टंचाई बाबत ,पाण्याचे नियोजन आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाय योजना याबाबत लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच असगोली पंचायत समिती सदस्य सौ. उर्वी उमेश खैर यांनी स्वतः उपस्थित राहून श्रमदान करून ग्रामस्थांचे आभार मानले. Vanrai check dams at Palpene यावेळी पालपेणे ग्रामपंचायत ग्रामसेविका सौ. पेडणेकर मॅडम तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. राजेश घाणेकर, श्री. गायकर आणि श्री. प्रशांत घाणेकर हे देखील उपस्थित होते. पालपेणे ग्रामपंचायत आणि गावातील सर्व ग्रामस्थांचे या कार्यासाठी विशेष सहकार्य लाभले. Vanrai check dams at Palpene
