• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सोमवारी गुहागरच्या प्रभाग 16 मध्ये होणार लसीकरण

Vaccination in Guhagar Ward 16

by Mayuresh Patnakar
July 11, 2021
in Old News
16 0
0
कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा जांगळवाडी येथे सोमवार 12 जुलै रोजी कोविशिल्डचे लसीकरण होणार आहे. अशी माहिती या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती अमोल गोयथळे यांनी दिली.
गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणाला सुरवात केली आहे. गुरुवारी 8 जुलैला प्रभाग 17 मध्ये घेतलेले लसीकरण यशस्वी झाले. नागरिकांनी देखील प्रभाग निहाय लसीकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे सोमवारी होणारे लसीकरण देखील प्रभाग निहाय करण्यात येणार आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग 16 मध्ये खालचापाट भंडारवाडा मधील काही भाग, भाटीआळी आणि लोखंडे विभागातील काही भाग येतो. या प्रभागात रहाणाऱ्या 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना कोविशिल्डचा पहिला डोस सोमवारी, 12 जुलैला देण्यात येणार आहे. तसेच कोविशिल्डचा पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झाले आहेत अशा गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जांगळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र आहे. सोमवारी 12 जुलैला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.  सकाळी 8.30 वा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे टोकन देण्यास सुरवात होईल. अशी माहिती सभापती अमोल गोयथळे यांनी दिली आहे.

Tags: Breaking NewsCovishieldGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiVaccinationWard 16टॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.