शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ
गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस उपलब्ध करुन देण्यात आला होता. 6 प्रभागांमधील 203 ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाला लाभ घेत लस घेतली.
Guhagar Nagarpanchyat arranged Wardwise Vaccination Facility in Guhagar City. Vaccination is done in 5 places. The 203 Senior citizens were vaccinated through the Facility.
मर्यादित स्वरुपात येणारी लस आणि मर्यादित ठिकाणी होणारे लसीकरण यामुळे आजही अनेक ज्येष्ठ नागरिक लसीपासून वंचित आहे. गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी स्वतंत्र लस मिळावी. अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि मुख्याधिकारी कविता बोरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली होती. ही मागणी मान्य करत जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी (ता. 5 जून) गुहागर नगरपंचायतीला लसीचे 200 स्वतंत्र डोस उपलब्ध असल्याचे कळविले. गुहागर नगरपंचायतीने तातडीने नगरसेवकांच्या मदतीने तीन प्रभागातील नियोजन केले. शनिवारी प्रभाग क्र. १ मधील जांभळादेवी मंदिर, प्रभाग २ मध्ये नरनारायण मंदिर, प्रभाग ३ मध्ये महागणपती मंदिर या ठिकाणी लसीकरण सुरु झाले. परंतू ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी असल्याने लस शिल्लक रहात होती. शहराला दिलेला कोटा परत मिळणार नाही याची जाणिव असल्याने नगरपंचायतीने धावपळ करुन प्रभाग 4, 5 व 7 मधील जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचे निरोप दिले. प्रभाग ४ व प्रभाग 5 मधील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सोमेश्र्वर मंदिर या ठिकाणी करण्यात आले. तर प्रभाग 7 मधील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण जीवन शिक्षण शाळा क्र. 1 मध्ये करण्यात आले. उपलब्ध डोसांपेक्षा 3 डोस अधिक लागले. ते डोस देण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाने केली. लसीकरणाचे काम 2 नर्स, 2 आशा सेविका आणि 3 शिक्षकांच्या पथकाने केले.
या उपक्रमामध्ये लसीकरण केंद्र तयार करणे, तेथे लसीकरणाचे सामान ने आण करणे, पथकातील सदस्यांना नेणे, नागरिकांना केंद्रावर आणणे, आदी सर्व नियोजन नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता आशिष खांबे व प्रणोलकुमार खताळ, नगर रचनाकार समाधान जगदाळे, नगरपंचायत कर्मचारी सुनील नवजेकर, ओंकार लोखंडे, जनार्दन साटले, प्रितम वराडकर, संदेश असगोलकर यांनी केले. तर लसीकरणाचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष राजेश बेंडल, मुख्याधिकारी कविता बोरकर, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, भाजपचे गटनेते उमेश भोसले, सौ. मनाली सांगळे, सौ. नेहा सांगळे, नगरसेवक समीर घाणेकर यांनी मेहनत घेतली.