• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 May 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विनापरवाना हॉटेल-बेकरी व्यावसायिक धास्तावले

by Mayuresh Patnakar
May 29, 2026
in Maharashtra
63 1
0
Unlicensed Hotel and Bakery Operators Alarmed
124
SHARES
353
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तुकाराम मुंढेची राज्यभरात धडक कारवाई; खाद्यव्यवसायांमध्ये मोठी खळबळ

गुहागर, ता. 29 : कडक प्रशासनशैली आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी राज्यभरात आपली धडक कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील विनापरवाना हॉटेल, लॉजिंग, बेकरी आणि खाद्यव्यवसायांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः दापोली, गुहागर, गणपतीपुळे, हरिहरेश्वर आणि रत्नागिरी किनारपट्टी परिसरातील नियमबाह्य व्यवसायिकांनी आता धास्ती घेतल्याचे चित्र दिसत आहे. Unlicensed Hotel and Bakery Operators Alarmed

दरवर्षी हजारो पर्यटक कोकण किनारपट्टीवर दाखल होत असताना अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांना अक्षरशः हरताळ फासून व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विनापरवाना हॉटेल्स, अस्वच्छ खाऊ गल्ल्या, अनधिकृत टपऱ्या, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच पर्यटकांची आर्थिक फसवणूक यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पाव, खारी, बिस्कीट, बटर, नानकटाई, केक आणि विविध मिठाई पदार्थांची विक्री करणाऱ्या काही बेकरी व स्वीट मार्टमधून विकल्या गेलेल्या अन्नपदार्थांमुळे कोकणातील अनेक भागांत विषबाधेच्या घटना घडल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले होते. अनेक भटारखान्यांमध्ये अस्वच्छता, कालबाह्य साहित्याचा वापर, निकृष्ट तेल, दूषित पाणी आणि अन्नसाठवणुकीतील गंभीर निष्काळजीपणा असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या आहेत. Unlicensed Hotel and Bakery Operators Alarmed

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत हॉटेल्स, बेकरी, मिठाई दुकाने, किराणा दुकाने, पाणी बाटली प्रकल्प, मेडिकल स्टोअर्स तसेच औषध विक्री व्यवसायांची तपासणी केली जाते. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई, अन्न नमुने तपासणी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण परवाने पडताळणी, बनावट औषधांवर छापे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्री रोखणे, गुटखा व सुगंधित तंबाखूविरोधी मोहीम यासह ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी ही महत्त्वाची जबाबदारी विभागाकडे आहे. याशिवाय रक्तपेढ्या, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन, इंजेक्शन आणि जीवनरक्षक औषधांच्या गुणवत्तेची तपासणीही या विभागामार्फत केली जाते. त्यामुळे मुंडे यांच्या शिस्तप्रिय आणि धडक कार्यपद्धतीमुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात अचानक तपासण्या, परवाना पडताळणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Unlicensed Hotel and Bakery Operators Alarmed

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnlicensed Hotel and Bakery Operators Alarmedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.