मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषकाचे आयोजन
गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य सभापती आणि प्रभाग १६ मधील नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सहकार्याने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्या संघाला रोख रक्कम ५५५५/- चषक, उपविजेत्या संघास ३३३३/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, सामनावीर, मालिकविर यांची निवड करून चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
मारुती छाया क्रिकेट संघ गेली अनेक वर्षे क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत सलग १८ विजेतेपद प्राप्त केले आहे. अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद आणि उपविजेते पद पटकाविले आहे. आता या संघामध्ये नवीन खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या अष्टपैलू खेळाच्या प्रदर्शनातून संघाला विविध ठिकाणी यश मिळवून दिले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक व मुंबईत कामधंद्यासाठी गेलेले सदस्य मेहनत घेत आहेत.